बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा , अपने मोबाइल से ऑटो sms भेजकर मार्केटिंग करे विजिट करे http://autotextsms.com/ बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा http://autotextsms.com/

T20 मराठी sms


T20 मराठी sms


गुरुजींनी वर्गामध्ये एक गंभीर विषय छेडला.
 
 गुरूजी: (अतिउत्साहात) मुलांनो, सध्या T20 प्रकार खुपच फार्मात आहे. तुमच्या परीक्षा सुद्धा जर T20 सारख्या असल्या तर त्यांचे स्वरूप कसे असेल? कोणाला काही कल्पना?😇
 
 
 पूर्ण वर्ग अचानक शांत झाला. कोणाला काहीच सुचेना.
 ब-याच वेळानंतर बंड्याने हात वर केला. बंड्या एक व्रात्य आणि खोडकर मुलगा आहे हे पूर्ण वर्गाला माहीत होते.😉
 
 गुरूजी (नकारात्मक स्वरूपात) : हा लवकर सांग काय सांगायचे ते.🙄
 
 बंड्या गंभीर मुद्रा करून सांगु लागला.
 
  "गुरूजी परीक्षा १ तास २० मिनटाची असली पाहीजे."😁
 
 गुरूजी: "ठीक आहे, पुढे?"
 
 बंड्या: "दर २० मिनटानंतर विद्यार्थ्यांना आपापसात बोलण्याकरता २ मिनटाचा time off असला पाहीजे."😍
 
 गुरूजी टेंशन मध्ये: "बरं पुढे?"
 
 बंड्या: "पहिले ३० मिनिटे Power-play असला पाहिजे, ज्यात शिक्षक वर्गाबाहेर असतील."😳
 
 गुरूजींना हल्का हल्का घाम फूटू लागला.
 
 बंड्या: "प्रश्नपत्रिकेतील एक प्रश्न फ्री हिट असला पाहिजे. विद्यार्थ्यांनी जे काही उत्तर लिहिले असेल त्याला पूर्ण मार्क मिळाले पाहिजेत."😊
 
 गुरूजींचे कपडे घामाने ओले झाले.
 
 बंड्या: "आणि कोणी पुरवणी घेतली की चिअर Girls नीं वर्गात येऊन २ मिनिट डांस केला पाहिजे."💃🏻💃🏻
 
 पूर्ण वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि विद्यार्थी बंड्या ला खांद्यावर घेऊन नाचू लागले.☝🏻☝🏻👏🏻👏🏻
 
 गुरूजी कायमचे पावर प्ले मध्ये (वर्गाबाहेर) गेले. 😷😂😂

😀😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁

*हसलात ना असच हसत रहा

Labels

Find Us On Facebook

Latest Post

मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत

 दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती        इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्...