फार्मर फ्रेंड कविता
Farmar Friend
गावाकडला बबन्यासुद्धा
फेसबुकवर टाकतो पोष्ट...
बदललेल्या गावाची
सांगतो तुम्हाला गोष्ट.....।।
गावं माणसं शेतीवाडी,
सगळं झालयं ओल्ड...
कांताबाई,शांताबाईसुद्धा
झालीय आता बोल्ड...।।
शेतकरी झालायं फार्मर,
मळा झालायं फार्म...
झोपडीत लागलायं एसी,
तापमान झालयं वार्म.....।।
लोण्याला म्हणती बटर,
अन् पाण्याला म्हणती वाटर...
तुपालाही म्हणू लागलेत आता देशी घी,
देशी पीताना म्हणती थोडं वाॅटर टाकून पी...।।
काळ आता बदललाय,
नवं नवं आलयं टेकनीक...
पिटलं भाकरी खाण्यासाठी,
निघू लागल्यात पिकनीक.....।।
धोतर टोपी सद-याऐवजी,
घालू लागलेत जीन्स....
लुगड्याऐवजी गाऊन घालून,
फिरु लागल्यात क्विन्स....।।
हरीपाठाऐवजी आता ,
करु लागलेत प्रेयर...
म्हातारासुद्धा म्हातारीला,
म्हणू लागलाय डियर...।।
गावाकडल्या हागणदारीचा,
मोठा झालाय इश्यू.....
पाण्याऐवजी आता,
टाॅयलेटला लागतोय टीश्यू.....।।
नाती संपली शेती संपली,
गावाचं झालयं व्हिलेज...
पिकपाणी सांगणारं ,
आटून गेलयं नाॅलेज....।।
वायफाय ईंटरनेटमुळं,
बरबाद झालीय पिढी...
बांधावरली पोट्टेसुद्धा ,
घोकू लागलीत एबीसीडी....।।
फेसबूक, व्हाटसअॅपपायी,
तरुण झालेत मॅड...
कर्जामुळं निराशेपोटी,
आत्महत्त्येचं आलयं फॅड....।।
एवढचं करा गाॅड विठ्ठला,
आता पाडा रेन....
हॅपी होवू द्या फार्मर,
कमी होवू द्या पेन.....।।
*फार्मर फ्रेंड!*