बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा , अपने मोबाइल से ऑटो sms भेजकर मार्केटिंग करे विजिट करे http://autotextsms.com/ बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा http://autotextsms.com/
Showing posts with label जीवनात सुखी राहण्याचे उपाय. Show all posts
Showing posts with label जीवनात सुखी राहण्याचे उपाय. Show all posts

जीवनात सुखी राहण्याचे उपाय









मराठी संत वचन
जीवनात सुखी राहण्याचे उपाय




१) दुसऱ्याच्या भानगडीत नाक खुपसू नका :
अनेकदा आपण दुसऱ्याच्या भानगडीत वरचेवर नाक खुपसून स्वत:च गोत्यात येत असतो. अर्थात याला कारण असते “माझा मार्गच बरोबर आहे , माझ्या विचाराची दिशाच योग्य आहे आणि जे याच्याशी सहमत नाहीत त्यांच्या गळी आपले म्हणणे कसेही करून उतरवले पाहिजे” ही विचारसरणी. ही विचारसरणी दुसऱ्या व्यक्तीचे अस्तित्वच अमान्य करते, तसेच देवाच्या अस्तित्वालाच आव्हान देते. प्रत्येक व्यक्तीची जडणघडण वेगळी आहे, दोन माणसे एकच विचार किंवा कृती करतील असे होत नाही. देवाने जशी बुद्धी दिली आहे तसा प्रत्येकजण विचार करीत असतो. आपले काम ध्यान देवून केले तरी खूप झाले !

२) क्षमा करा आणि विसरून जा:
मन:शांती मिळविण्याचे हे खूप प्रभावी तत्व आहे. आपला अपमान करणाऱ्या वा आपल्याला दुखविणाऱ्या व्यक्तीचा आपण आतून राग राग करीत राहतो, सूडभावना जोपासतो. यातूनच मग निद्रानाश, पोटाचे विकार, अति-रक्तदाब असे विकार जडतात. आपला अपमान तर एकदाच झालेला असतो पण सूडभावना धगधगत मात्र कायम राहते. सूडभावना सोडा. आयुष्यात करायच्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत, सूडाने जळत राहून आपलेच आयुष्य का जाळायचे ? झाले गेले गंगेला मिळाले या उक्तीप्रमाणे वागा.

३) स्तुतीपुंजक बनू नका :
जगात सगळीकडे नुसता स्वार्थ भरलेला आहे. तोंडपुंजेपणा करणारे का कमी आहेत ? आज तुमची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणारे संधी मिळताच तुमच्यावर चिखलफेक करतील. तेव्हा मला मोठा म्हणा हा अट्टाहास का ? तुमच्या भोवती दिवे ओवाळणाऱ्यांना
जराही महत्व देवू नका. तुमचे काम नीतीची चाड न सोडता आणि प्रामाणिकपणे करीत रहा.

४) द्वेष करू नका :
द्वेष करणाऱ्यांमुळे मनाची शांती कशी बिघडते याचा अनुभव प्रत्येकाने घेतला असेलच. असेही होते की कामात अधिक मेहनत घेवून सुद्धा बढती मात्र भलत्यालाच मिळते. धंद्यात सुद्धा आपला पुरेसा जम बसत नसताना नव्याने शिरकाव केलेला बस्तान बसवितो. असे अनेकदा होतच असते. यासाठी आपण द्वेषभावना जोपासायची का ? नाही. प्रत्येकाच्या कपाळावर सटवाईने जे लिहिले आहे ते होणारच आहे, ज्याला यश मिळाले ते त्याचे विधीलिखित होते. विधीलिखित टळू शकत नाही, कोणी ते बदलू शकत नाही किंवा त्यापासून कोणी पळू शकत नाही. तुमच्या नशिबात एखादी गोष्ट नाही त्याला दुसऱ्याला दोष देण्यात काय हशील ? द्वेष करून काहीही साध्य होणार नाही उलट त्या आगीत तुमच्या मनाची शांतीच राख होऊन जाईल.

५) प्रवाहाबरोबर चाला:
तुम्ही एकटे प्रवाहाची दिशा नक्कीच बदलू शकणार नाही. यात बुडायची शक्यताच जास्त. त्यापेक्षा प्रवाहाबरोबर गेल्यास तुम्हाला अकस्मात प्रवाहाबरोबर जुळवून घेता घेताच आगळ्या एकात्मतेची प्रचीती येइल.

६) संकटांचा धैर्याने मुकाबला करा :
प्रत्येक अपयश ही पुढील यशाची पायरी असते. दर दिवशी आपण अनेक अडथळ्यांचा, व्याधींचा, उद्रेकाचा, अपघातांचा सामना करीतच असतो. यावर जेव्हा काही उपाय सापडत नसतो तेव्हा काही वेळ संकटांशी जुळवून घ्यायला शिका. या सगळ्यांना खंबीरपणे तोंड द्या. संकटांसमोर शरणागती पत्करून उमेद जगण्याची हरवून बसू नका. स्वत:वर विश्वास ठेवा. धैर्य, आंतरिक शक्ती आणि दांडगी इच्छाशक्तीच तुम्हाला विजयाजवळ नेईल.

७) *अंथरूण पांघरून हातपाय पसरा* :
ही म्हण खरेतर कायमच लक्षात ठेवायला हवी. आपण आपली क्षमता न ओळखता खोट्या मोठेपणासाठी नको ती जबाबदारी डोक्यावर घेत असतो. याने आपला अहंकार कुरवाळला जातो. आपल्या मर्यादा ओळखायला शिका. नाकापेक्षा मोती जड अशी अवस्था का करून घ्यायची ? भौतिकसुखाच्या मागे लागल्यास मन:शांती कधीही मिळणार नाही.भौतिक सुखाच्या मृगजळामागे न धावता तो वेळ प्रार्थनेला द्या, स्वत:च्या आत डोकावून बघा, ध्यान करा. याने तुमचे चित्त टाळ्यावर येईल. निर्मळ मन तुम्हाला अधिक मानसिक समाधान देईल.

८) नित्यनेमाने ध्यानधारणा करा :
ध्यानाने मन शांत होते व अस्वस्थ करणाऱ्या
विचारांपासून तुमची सूटका होते. यातून तुम्ही परमशांती प्राप्त करू शकता.प्रामाणिकपणे रोज अर्धा तास जरी ध्यान केले तरी बाकी साडेतेवीस तास तुमचे मन प्रसन्न राहील. या ना त्या कारणाने ढळणारा मनाचा तोल सावरेल. ध्यानाचा वेळ थोडा थोडा वाढवित नेल्यास अधिक समाधान मिळेल. तुम्हाला असे वाटणे स्वाभाविक आहे की ध्यानधारण करीत बसल्यास बाकीची कामे रेंगाळतील. पण या उलट तुमची कार्यक्षमता वाढून तुमची सर्व कामे अधिक कुशलतेने तुम्ही कमी वेळात करू शकाल.

९) मनाला कोठेतरी गुंतवून ठेवा :
इंग्रजीत “An Empty Mind is Devil’s Workshop” असे म्हणतात. रिकाम्या मनात जगातले सगळे वाईट विचार येतात. मन चिंती ते वैरी न चिंती. काहीतरी सकारात्मक, विधायक कार्य करण्यात मनाला गुंतवून ठेवा.एखादा छंद जोपासा. तुम्हाला आवडणारे काहीतरी करा. पैसा की समाधान यात तुम्हाला काय जास्त प्रिय ते एकदा ठरवा.तुम्ही जोपासलेला छंद किंवा समाजसेवा, देवाधर्माचे काम यातून तुम्हाला पैसा मिळेलच असे नाही पण भरून पावल्याचे , काही केल्याचे समाधान मात्र नक्कीच मिळेल.अगदी शरीर थकल्याने विश्रांती घेत असाल तेव्हा सुद्धा काही चांगले वाचा नाहीतर नामस्मरण तरी करा.

१०) धरसोड वृत्ती सोडा , खंत करू नका:
“करू की नको” असा विचार करीत राहिल्यास कृती काही होणार नाही मात्र दिवस, आठवडे, महिने, वर्ष वाया जाईल व डोक्याला ताप मात्र होईल. नियतीने तुमच्या पुढ्यात काय वाढलेले आहे याचा थांगपत्ता तुम्हाला कधीही लागणार नाही. तेव्हा उगीच घोळ न घालता ज्या वेळी जे करणे योग्य आहे त्या वेळी ते करा. जरी अपयश आले तरी त्यातूनच तुम्हाला मार्ग सापडेल. डोक्याला हात लावून बसाल तर मात्र कार्यनाश होणार. तसेच भूतकाळातली मढी उकरू नका. जे झाले त्याची खंत बाळगू नका. जो हो गया सो हो गया ! तकदीर मे लिखा था वही हुवा ! कोळसा कितीही उगाळला तरी काळाच ! सकारात्मक दृष्टीकोन बाळगा !


x

Labels

Find Us On Facebook

Latest Post

मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत

 दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती        इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्...