बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा , अपने मोबाइल से ऑटो sms भेजकर मार्केटिंग करे विजिट करे http://autotextsms.com/ बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा http://autotextsms.com/

पुणेरी जोक्स मराठी









पुणेरी जोक्स मराठी

हसत-हसत शेअर करा


एक स्त्री आणि एक पुरूष दोघांच्या गाडीचा अपघात होतो.

चूक स्त्रीची असते.

ती अचानक मध्ये आलेली असते.

सुदैव हे की दोघांच्या गाड्यांचे बरेच नुकसान झालेले असते,

तरी दोघांना किरकोळ खरचटणे सोडून मार लागलेला नसतो.

दोघं कसे तरी बाहेर येतात.

पुरूष काही बोलणार इतक्यात ती स्त्री पर्समधून नवी कोरी
क्वार्टर काढते.

"मला माहीत आहे, आपण दोघंही या घटनेने
हादरलो आहोत.

जरा शांत होऊ या आणि मग बोलू.

घ्या जरा दोन पेग मारा, मी पण घेईन आणि मग
ठरवू काय ते".

पुरूष क्वार्टर हातात घेऊन अर्धी पिऊन स्त्रीला परत करतो.

ती स्त्री शांतपणे बाटली परत पर्स मध्ये ठेवते.

"तुम्ही नाही घेणार?" तो विचारतो.

"नाही" स्त्री उत्तरली
.
.
.
.
.

"आता आपण पोलिसांची वाट पाहू या.

तेच ठरवतील दोष कोणाचा आहे ते."

(ती बाई पुण्यात वकील असते)

आता बसा बोंबलत.....
आरं किती घाई प्यायची

हिऱ्याची गोष्ट मराठी motivatiom

एक बाई मोलकरीण म्हणुन एका राजमहालात काम करत असते.
तिला लहान मुलगा असल्याने ती त्याला तिच्या सोबतच कामाला येतांना घेऊन यायची.
एक दिवस त्या मुलाला खेळता खेळता राजमहालात हिरा सापडतो,
तो मुलगा तो हिरा घेऊन पळत आईकडे जातो आणि सांगतो की, "आई बघ मला हिरा सापडला !"
मोलकरीण हुशार असते.
तिला वाटते, हा हिरा घेऊन आपण राजमहालाबाहेर जाऊ शकणार नाही !
ती मुलाला म्हणते, "नाही रे ! काच आहे, हा हिरा नाही.", असे म्हणुन ती तो हिरा बाहेर फेकुन देते.
काम आटोपल्यावर जेव्हा ती घरी जायला निघते तेव्हा ती तो हिरा सोबत घेऊन जाते.
मग ती तो हिरा सोनाराकडे घेऊन जाते. सोनाराला कळतं की, हिला हा हिरा कुठंतरी सापडला असणार,
हिला काय माहीत ? हा हिराच आहे ! म्हणुन तो सोनार तिला म्हणतो, "हा हिरा नाही, ही तर काच आहे!"
आणि असे म्हणुन तो पण तो हिरा बाहेर फेकुन देतो.
जेव्हा ती घरी जाते तेव्हा तो सोनार बाहेर जाऊन तो हिरा घेऊन येतो व जोहरीकडे घेऊन जातो.
जोहरी हिरा पाहतो, त्याला कळतं हा हिरा अनमोल आहे, त्याची नियत खराब होते.
तो हिरा घेतो आणि बाहेर फेकुन देतो आणि "काच आहे", असं म्हणतो.
जसा हिरा बाहेर पडतो तसे त्याचे तुकडे तुकडे होऊन जातात. हे सगळं एक वाटसरु लांबुन पहात असतो.
तो त्या हिऱ्याजवळ येतो आणि त्याला म्हणतो, "मोलकरीण आणि सोनार ह्या दोघांनी तुला दोन वेळा फेकलं तेव्हा तु तुटला नाही,
पण आता का तू तुटला ?"
हिरा म्हणतो, "जेंव्हा मोलकरीण व सोनाराने मला फेकले तेव्हा ते माझी खरी किंमत जाणत नव्हते.
परंतु जोहरी तर माझी किंमत जाणत होता तरी त्याने मला फेकले !
हा आघात मी सहन करुच शकलो नाही,
म्हणुन मी तुटलो."
मनुष्याच्या बाबतीत असेच होत असते, जे तुम्ही काय आहे हे जाणुन पण तुमचं मन तुडवतात तेव्हा तो आघात सहन करु शकत नाही.
म्हणुन कधीही आपल्या लोकांचं जराश्या स्वार्था करता मन तोडु नका...
आपल्या आजुबाजुची खुप सारी आपली माणसं
हिऱ्यासारखी असतात, त्यांच्या भावना व मन दुखवून त्यांच्या चांगल्या गुणांचे तुकडे तुकडे करू नका....

📚 गोष्ट (संकलित)

जीवनात सुखी राहण्याचे उपाय









मराठी संत वचन
जीवनात सुखी राहण्याचे उपाय




१) दुसऱ्याच्या भानगडीत नाक खुपसू नका :
अनेकदा आपण दुसऱ्याच्या भानगडीत वरचेवर नाक खुपसून स्वत:च गोत्यात येत असतो. अर्थात याला कारण असते “माझा मार्गच बरोबर आहे , माझ्या विचाराची दिशाच योग्य आहे आणि जे याच्याशी सहमत नाहीत त्यांच्या गळी आपले म्हणणे कसेही करून उतरवले पाहिजे” ही विचारसरणी. ही विचारसरणी दुसऱ्या व्यक्तीचे अस्तित्वच अमान्य करते, तसेच देवाच्या अस्तित्वालाच आव्हान देते. प्रत्येक व्यक्तीची जडणघडण वेगळी आहे, दोन माणसे एकच विचार किंवा कृती करतील असे होत नाही. देवाने जशी बुद्धी दिली आहे तसा प्रत्येकजण विचार करीत असतो. आपले काम ध्यान देवून केले तरी खूप झाले !

२) क्षमा करा आणि विसरून जा:
मन:शांती मिळविण्याचे हे खूप प्रभावी तत्व आहे. आपला अपमान करणाऱ्या वा आपल्याला दुखविणाऱ्या व्यक्तीचा आपण आतून राग राग करीत राहतो, सूडभावना जोपासतो. यातूनच मग निद्रानाश, पोटाचे विकार, अति-रक्तदाब असे विकार जडतात. आपला अपमान तर एकदाच झालेला असतो पण सूडभावना धगधगत मात्र कायम राहते. सूडभावना सोडा. आयुष्यात करायच्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत, सूडाने जळत राहून आपलेच आयुष्य का जाळायचे ? झाले गेले गंगेला मिळाले या उक्तीप्रमाणे वागा.

३) स्तुतीपुंजक बनू नका :
जगात सगळीकडे नुसता स्वार्थ भरलेला आहे. तोंडपुंजेपणा करणारे का कमी आहेत ? आज तुमची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणारे संधी मिळताच तुमच्यावर चिखलफेक करतील. तेव्हा मला मोठा म्हणा हा अट्टाहास का ? तुमच्या भोवती दिवे ओवाळणाऱ्यांना
जराही महत्व देवू नका. तुमचे काम नीतीची चाड न सोडता आणि प्रामाणिकपणे करीत रहा.

४) द्वेष करू नका :
द्वेष करणाऱ्यांमुळे मनाची शांती कशी बिघडते याचा अनुभव प्रत्येकाने घेतला असेलच. असेही होते की कामात अधिक मेहनत घेवून सुद्धा बढती मात्र भलत्यालाच मिळते. धंद्यात सुद्धा आपला पुरेसा जम बसत नसताना नव्याने शिरकाव केलेला बस्तान बसवितो. असे अनेकदा होतच असते. यासाठी आपण द्वेषभावना जोपासायची का ? नाही. प्रत्येकाच्या कपाळावर सटवाईने जे लिहिले आहे ते होणारच आहे, ज्याला यश मिळाले ते त्याचे विधीलिखित होते. विधीलिखित टळू शकत नाही, कोणी ते बदलू शकत नाही किंवा त्यापासून कोणी पळू शकत नाही. तुमच्या नशिबात एखादी गोष्ट नाही त्याला दुसऱ्याला दोष देण्यात काय हशील ? द्वेष करून काहीही साध्य होणार नाही उलट त्या आगीत तुमच्या मनाची शांतीच राख होऊन जाईल.

५) प्रवाहाबरोबर चाला:
तुम्ही एकटे प्रवाहाची दिशा नक्कीच बदलू शकणार नाही. यात बुडायची शक्यताच जास्त. त्यापेक्षा प्रवाहाबरोबर गेल्यास तुम्हाला अकस्मात प्रवाहाबरोबर जुळवून घेता घेताच आगळ्या एकात्मतेची प्रचीती येइल.

६) संकटांचा धैर्याने मुकाबला करा :
प्रत्येक अपयश ही पुढील यशाची पायरी असते. दर दिवशी आपण अनेक अडथळ्यांचा, व्याधींचा, उद्रेकाचा, अपघातांचा सामना करीतच असतो. यावर जेव्हा काही उपाय सापडत नसतो तेव्हा काही वेळ संकटांशी जुळवून घ्यायला शिका. या सगळ्यांना खंबीरपणे तोंड द्या. संकटांसमोर शरणागती पत्करून उमेद जगण्याची हरवून बसू नका. स्वत:वर विश्वास ठेवा. धैर्य, आंतरिक शक्ती आणि दांडगी इच्छाशक्तीच तुम्हाला विजयाजवळ नेईल.

७) *अंथरूण पांघरून हातपाय पसरा* :
ही म्हण खरेतर कायमच लक्षात ठेवायला हवी. आपण आपली क्षमता न ओळखता खोट्या मोठेपणासाठी नको ती जबाबदारी डोक्यावर घेत असतो. याने आपला अहंकार कुरवाळला जातो. आपल्या मर्यादा ओळखायला शिका. नाकापेक्षा मोती जड अशी अवस्था का करून घ्यायची ? भौतिकसुखाच्या मागे लागल्यास मन:शांती कधीही मिळणार नाही.भौतिक सुखाच्या मृगजळामागे न धावता तो वेळ प्रार्थनेला द्या, स्वत:च्या आत डोकावून बघा, ध्यान करा. याने तुमचे चित्त टाळ्यावर येईल. निर्मळ मन तुम्हाला अधिक मानसिक समाधान देईल.

८) नित्यनेमाने ध्यानधारणा करा :
ध्यानाने मन शांत होते व अस्वस्थ करणाऱ्या
विचारांपासून तुमची सूटका होते. यातून तुम्ही परमशांती प्राप्त करू शकता.प्रामाणिकपणे रोज अर्धा तास जरी ध्यान केले तरी बाकी साडेतेवीस तास तुमचे मन प्रसन्न राहील. या ना त्या कारणाने ढळणारा मनाचा तोल सावरेल. ध्यानाचा वेळ थोडा थोडा वाढवित नेल्यास अधिक समाधान मिळेल. तुम्हाला असे वाटणे स्वाभाविक आहे की ध्यानधारण करीत बसल्यास बाकीची कामे रेंगाळतील. पण या उलट तुमची कार्यक्षमता वाढून तुमची सर्व कामे अधिक कुशलतेने तुम्ही कमी वेळात करू शकाल.

९) मनाला कोठेतरी गुंतवून ठेवा :
इंग्रजीत “An Empty Mind is Devil’s Workshop” असे म्हणतात. रिकाम्या मनात जगातले सगळे वाईट विचार येतात. मन चिंती ते वैरी न चिंती. काहीतरी सकारात्मक, विधायक कार्य करण्यात मनाला गुंतवून ठेवा.एखादा छंद जोपासा. तुम्हाला आवडणारे काहीतरी करा. पैसा की समाधान यात तुम्हाला काय जास्त प्रिय ते एकदा ठरवा.तुम्ही जोपासलेला छंद किंवा समाजसेवा, देवाधर्माचे काम यातून तुम्हाला पैसा मिळेलच असे नाही पण भरून पावल्याचे , काही केल्याचे समाधान मात्र नक्कीच मिळेल.अगदी शरीर थकल्याने विश्रांती घेत असाल तेव्हा सुद्धा काही चांगले वाचा नाहीतर नामस्मरण तरी करा.

१०) धरसोड वृत्ती सोडा , खंत करू नका:
“करू की नको” असा विचार करीत राहिल्यास कृती काही होणार नाही मात्र दिवस, आठवडे, महिने, वर्ष वाया जाईल व डोक्याला ताप मात्र होईल. नियतीने तुमच्या पुढ्यात काय वाढलेले आहे याचा थांगपत्ता तुम्हाला कधीही लागणार नाही. तेव्हा उगीच घोळ न घालता ज्या वेळी जे करणे योग्य आहे त्या वेळी ते करा. जरी अपयश आले तरी त्यातूनच तुम्हाला मार्ग सापडेल. डोक्याला हात लावून बसाल तर मात्र कार्यनाश होणार. तसेच भूतकाळातली मढी उकरू नका. जे झाले त्याची खंत बाळगू नका. जो हो गया सो हो गया ! तकदीर मे लिखा था वही हुवा ! कोळसा कितीही उगाळला तरी काळाच ! सकारात्मक दृष्टीकोन बाळगा !


x

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
!!.शुभ सकाळ.!!

समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही,
समाधानासारखे कोणतेही सुख नाही,
लोभासारखा कोणताही आजार नाही,
आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही...
"तुमचा येणारा प्रत्येक दिवस
आनंदात जावो आणि मन सदा प्रसन्न राहो.".

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

नरक चतुर्दशी का साजरी करतात

नरक चतुर्दशी का साजरी करतात?
नरक चतुर्दशी चे महत्व?

श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे  पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाःकार उडाला.

श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला.*

नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ साजरा केला जाणार्‍या दिवाळीतील या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते.

या दिवशी यमदीपदान करून ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते.या सणाचे महत्त्व आणि या दिवशी करण्यात येणार्‍या कृतींमागील शास्त्र या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.

Diwali special message

शुभ दिपावली special message
शुभ दिपावली special
एक करंजी..
           आनंदाने भरलेली..
एक शंकरपाळी..
            चौकस विचाराची..
एक चकली..
           कीर्ती विस्तारणारी..
एक लाडू..
         ऐक्याने एकवटलेला*..
    एक मिठाई..
            मनात गोडवा भरलेली..
एक दिवा..  
           मांगल्य भरलेला..
एक रांगोळी..
             जीवनात रंग भरणारी..
    एक कंदील..
         यशाची भरारी घेणारा*..
*एक उटणे..
         जीवन सुगंधित करणारे..
     एक सण..
        समतोल राखणारा*..

    अन् एक मी.. 
            शुभेच्छा देणारा..
 
   " तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!

शुभ दिपावली

शुभ दिपावली special message

मी व माझ्या परिवाराकडून तुम्हाला
  दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा... 
हि दिवाळी तुम्हाला
आनंदाची ,भरभराटीची,
सुख समृद्धीची जाओ
हिच  ईश्वरचरणी प्रार्थना.

शुभ दिपावली
शुभ दिपावली special
शुभ दिपावली special message

दिपावली शुभेच्छा
सस्नेह नमस्कार,
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
हे नववर्ष आपणास
आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जावो ह्याच मनोकामना...!
.... धन्यवाद   !

शुभ दिपावली
शुभ दिपावली special
शुभ दिपावली special message

शुभ दिपावली
शुभ दिपावली special message
दीपावली निमित्त
आपणांस व आपल्या परिवारास
मन:पूर्वक हार्दिक लक्ष लक्ष शुभेच्छा !
ही दीपावली आपणास
सुख-समृद्धीची,ऐश्वर्याची,भरभराटीची,आनंदाची व आरोग्यमय जावो,
ही परमेश्वर चरणी नम्र प्रार्थना..

शुभ दिपावली
शुभ दिपावली special
शुभ दिपावली special message

ज्ञानाचा दीप उजळू दे,
विवेकाचा प्रकाश पसरू दे,
माणूसकीच्या लखलखाटाने,
भवताल सारे प्रसन्न होऊ दे!

सहिष्णूतेचे अत्तर लेवून
समतेचा आणि बांधवतेचा सुगंध घेऊन 
आसमंत सर्वांचा निरभ्र फुलू दे!

नीतीचे गोडवे गाताना
अनीतीवर प्रहार करण्याची निर्भयता
सकलांच्या अंगी नियमित राहू दे!  

वंचितांच्या न्यायासाठी
सत्तावानांशी
संघर्ष करायला
दुबळ्यांनाही बळ मिळू दे!

ही दीपावली आपणास
जगण्याची नवी चेतना देऊ दे!

निसर्ग आणि विचारांच्या प्रदुषणाने मुक्त दीपावलीच्या आपणास मन:पूर्वक सदिच्छा!

Happy Diwali

शुभ दिपावली
शुभ दिपावली special
शुभ दिपावली special message

पणत्या  सजून तयार आहेत
तेल आणि वातींसह

आकाशकंदील विराजमान झालाय
छोट्या छोट्या चांदण्यांसह

दरवाजाही केव्हापासून
तोरण बांधून सज्ज झालाय

अंगणही नटून बसलंय
रांगोळीचा गालिचा घेऊन

डबे सगळे तुडुंब आहेत
तिखट गोड स्वादासह

घर आता डोलू लागलंय
आनंदाच्या लहरींवर

आणि मन. ..
मन अगदी प्रफुल्लित
लाख लाख शुभेच्छांसह

आजचा दिवस त्याच शुभेच्छा देण्याचा...
"मी आणि  माझ्या कुटुंबियांकडून
आपणा सर्वांना
दिपावलीच्या आगमनाच्या
खूप खूप शुभेच्छा "
Wish you a very very
Happy Diwali
शुभ दिपावली
शुभ दिपावली special
शुभ दिपावली special message

॥ धनाची पुजा॥
॥ यशाचा प्रकाश॥
॥ किर्तीचे अभ्यंगस्नान॥
॥ मनाचे लक्ष्मीपुजन॥
॥ संबंधाचा फराळ॥
॥ समृध्दीचा पाडवा॥
॥ प्रेमाची भाऊबीज॥

!!!अशा या दिपावलीच्या
  अपणांस हार्दिक शुभेच्छा!!!

हि दिवाळी अपणांस व
आपल्या कुटुंबीयांस
सुखाची, सम्रुद्धीची व
भरभराटिची जावो हीच
सदिच्छा.
शुभ दिपावली

शुभ दिपावली special
शुभ दिपावली special message

सण दिवाळीचा आला।
नामा राऊळासी गेला।।1।।
हाती धरोनी देवासी।
चला आमुच्या घरासी।।2।।
देव घरासी आणिले।
चंदन पाटी बैसविले।।3।।
गोणाईने उटणे केले।
दामूशेटीने न्हानिले।।4।।
पदर माथ्याचा काढीला।
बाळ नंदाचा पुशिला।।5।।
घेऊनिया पंचारती।
चक्रपाणी ओवाळीती।।6।।
देव जेऊणी उठीले।
दासी जनीने विडे दिले।।7।।
शुभ दिपावली special message

Dipawali sanskrit message

दीपावली संस्कृत मेसेज
Dipawali sanskrit message

               *वर्षोद्भवम्*
               *शरत्पक्वधान्यम्,*
               *आल्हादकम्*
               *हेमंत-शिशीरशैत्यम्।*
               *मिष्टान्नभोगम्*
               *नववसनयोगम्,*
               *आनंदपर्वम्*
               *दीपोत्सवोऽयम्॥*
               ॥शुभ दीपावली॥

धनत्रयोदशी चे महत्त्व

धनत्रयोदशी चे महत्त्व

          
दिवाळी म्हणजे आनंदाचा क्षण. हा सण आश्विन वद्य त्रयोदशी पासून कार्तिक शुध्द द्वितीये पर्यंत पांच दिवस साजरा केला जातो. त्यात वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा पांच वेगवेगळ्या सणांचा समावेश झालेला आहे.

           दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. आश्विन कृष्ण त्रयोदशी या दिवसाला धनतेरस असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी धनाची व आयुर्वेदिक औषधींची पूजा करतात. या दिवशी एकत्र येऊन धन्वंतरी देवतेचे मनापासून स्मरण करावे. आयुर्वेदाचा अर्थ "आयुचे म्हणजे मानव जीवनाचे ज्ञान" असा आहे. भारतातील हे आयुर्विज्ञान सर्व जगात पसरले. निरोगी माणसाच्या स्वास्थ्याचे व रोगी माणसास रोगमुक्त करणाऱ्या आयुर्वेदाच्या मुलभूत सिध्दांताचे चिंतन व प्रचार प्रसार होणे आवश्यक आहे.*

           धनत्रयोदशीचा हा दिवस आणखी एका गोष्टीची स्मृती म्हणून पाळला जातो. क्षीरसागराच्या मंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली, त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून "धन्वंतरी" हे पांचवे रत्न बाहेर पडले. श्यामवर्ण, माथ्यावर मुकुट, डाव्या हातात कुंभ आणि उजवा अभयकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे. यांच्यापासून आयुर्वेद विकास पावला म्हणून त्यांना आदिदेव, अमृतयोनी, सुधापाणी अशा नांवानेही ओळखले जाते. यांच्यामुळे नाना  औषधांचा विकास झाला. अनेक वनस्पतींचे औषधीतत्व देवांना समजले. भगवान विष्णुंच्या अवतारात धन्वंतरीची गणना होते.

           या दिवशी धन्वंतरीचे पूजन करावे. धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे. धन्वंतरीचा फोटो मांडून पंचोपचारे पूजा करावी व धन्वंंतरी मंत्राचा एक माळ जप करावा,  व नैवेद्य अर्पण करावा. धन्वंतरीचे ध्यानमंत्र व जप हे सर्व सायंकाळी करावे. धन्वंतरीच्या उपासनेबरोबरच घरगुती आयुर्वेद ग्रंथाचे वाचन करावे, व दीर्घायुष्य, आरोग्य यासाठी प्रार्थना करावी. धन्वंतरी ही आरोग्याची अधिष्ठात्री देवता असल्याने त्यांच्या सेवेमुळे दीर्घायुष्य व आरोग्य लाभते.

Message for group Admin

Message for group Admin

एकदा अमेरीकन राष्ट्रपतिचे imported
हेलीकॉप्टर 🚡चालु होत नव्हतं..!!!

जगभरातुन mechanics बोलावले गेले तरीपण हेलिकॉप्टर🚡
चालु
होईना...!!!

अमेरिकीन 🇦🇺राष्ट्रपतिनी मग भारताला🇮🇳 निरोप
पाठवला..!!
प्रधानमंत्री मोदीँनी विचार केल
कि जापान , चीन , फ्राँस
च्या लोकांना जमला नाही तर भारतातुन कोण
करणार..??
पण कोणाला तरी पाठवन तर पङणारच होत....!!!
त्यांनी पेपरात📝 जाहिरात दिली..!!
सगळ्यांना वाटायला लागला "चीन जापान
ला नाही जमलं,, तर आपण काय चीज.? उगच
कशाला इज्जतीचा कचरा..!!

पणआपल्या admin👦 च्या ङोक्यात
आयडिया आली की ,
" चला जाउन तर बघुत,, तेवढाच अमेरीका फिरणं
होईल.!"
कोणीतरी जायला तयार झालं,! ऐकुन
मोदी खुष झाले, आणी admin ला पाठवण्यात
आले ......
.
Admin 👦ने निरिक्षण करत हेलीकोप्टर 🚡ला चार
प्रदक्षिणा घातल्या आणी बोलला...!!!!
"20,30 ताकतवान माणसं लागतील..!!"
माणसं आल्यानंतर admin म्हणला....
‘"हेलिकोप्टर🚡 ला ङाव्या बाजुने
उचला आणी उजवीकङे झुकवा..!!"‘

सगळे म्हणायला लागले काय पागल
माणसाला पाठवलय
भारताच्या लोकांनी.. पण
तरी त्यांनी तसं केला..!!
.
.
.
Admin👦-आता बघा चालु करुन...
.
!!!! चमत्कार !!!!!
.
हेलीकोप्टर🚡 स्टार्ट झाल ..!!! सगळ्यांनी  admin laं
अभिनंदन केलं...
.
मग
ओबामानी विचारला "कोणत्याही पार्टला हात न
लावता तु हे कसं केलस..?? काहि स्पेशल कोर्स
केलाय का..??"
.
.
.
.
.
.
Admin👦लाजत म्हणला - तसं काही नाहिये...
पण आमच्या कङे पेट्रोल संपल्यावर अशीच गाडी चालु करतात..

हसू😄😄😄
नका आपला अॅडमिन👦 लहानपणापासूच हुशार आहे पण कधी गर्व नाही केला
बिच्च्या-यानं.  
😜😜😛😛

हिटलर लोकशाही मोटीवशनल story

हिटलर लोकशाही मोटीवशनल story

एक दिवस हिटलरने त्याच्या पार्लमेंटमध्ये कोंबडा घेऊन आला....

आणि सर्वांच्या समोर त्याची एक एक पिसे खेचून काढू लागला....

कोंबडा वेदनेने विव्हळत होता, सुटण्यासाठी तडफडत होता....

एक एक करून हिटलरने त्याची सर्व पिसे खेचून काढली....

नंतर कोंबड्याला जमीनीवर फेकुन दिलं....

नंतर खिशातून काही दाणे काढून कोंबड्याच्या समोर टाकून सावकाशपणे पुढे पुढे चालू लागला....

तो कोंबडा दाणे खात खात हिटलरच्या मागे मागे चालू लागला....

हिटलर सारखे सारखे दाणे टाकत होता आणि कोंबडा ते खात त्याच्या मागून चालत होता...

शेवटी तो कोंबडा हिटलरच्या पायाजवळ येऊन उभा राहिला....

हिटलरने स्पीकर कडे पाहीले आणि महत्वाचे वाक्य बोलून गेला....

'' लोकशाही '' असलेल्या देशातील जनतेची अवस्था ही या कोंबड्या सारखी असते....

त्यांचे नेते जनतेचे सर्व काही लुटून घेतात, आणि त्यांना लुळे पांगळे, पार गरीब करून टाकतात...

आणि त्या नंतर त्यांच्या पुढ्यात थोडं थोडं तुकडा टाकत रहातात आणि नंतर त्यांच दैवत बनतात...

गोष्ट खरी असो नाहीतर काल्पनिक, पण वास्तव मात्र नाकारता येत नाही.

लोकशाही म्हणजे लोकांना मेंढरासारखे जगायला लावणारी समाज व्यवस्था नाही....!

प्रत्येकाने आपल्या मनाला एक प्रश्न विचारा... मला मेंढरासारखे जगायचे आहे की वाघा सारखे..?

Labels

Find Us On Facebook

Latest Post

मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत

 दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती        इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्...