हिटलर लोकशाही मोटीवशनल story
एक दिवस हिटलरने त्याच्या पार्लमेंटमध्ये कोंबडा घेऊन आला....
आणि सर्वांच्या समोर त्याची एक एक पिसे खेचून काढू लागला....
कोंबडा वेदनेने विव्हळत होता, सुटण्यासाठी तडफडत होता....
एक एक करून हिटलरने त्याची सर्व पिसे खेचून काढली....
नंतर कोंबड्याला जमीनीवर फेकुन दिलं....
नंतर खिशातून काही दाणे काढून कोंबड्याच्या समोर टाकून सावकाशपणे पुढे पुढे चालू लागला....
तो कोंबडा दाणे खात खात हिटलरच्या मागे मागे चालू लागला....
हिटलर सारखे सारखे दाणे टाकत होता आणि कोंबडा ते खात त्याच्या मागून चालत होता...
शेवटी तो कोंबडा हिटलरच्या पायाजवळ येऊन उभा राहिला....
हिटलरने स्पीकर कडे पाहीले आणि महत्वाचे वाक्य बोलून गेला....
'' लोकशाही '' असलेल्या देशातील जनतेची अवस्था ही या कोंबड्या सारखी असते....
त्यांचे नेते जनतेचे सर्व काही लुटून घेतात, आणि त्यांना लुळे पांगळे, पार गरीब करून टाकतात...
आणि त्या नंतर त्यांच्या पुढ्यात थोडं थोडं तुकडा टाकत रहातात आणि नंतर त्यांच दैवत बनतात...
गोष्ट खरी असो नाहीतर काल्पनिक, पण वास्तव मात्र नाकारता येत नाही.
लोकशाही म्हणजे लोकांना मेंढरासारखे जगायला लावणारी समाज व्यवस्था नाही....!
प्रत्येकाने आपल्या मनाला एक प्रश्न विचारा... मला मेंढरासारखे जगायचे आहे की वाघा सारखे..?