बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा , अपने मोबाइल से ऑटो sms भेजकर मार्केटिंग करे विजिट करे http://autotextsms.com/ बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा http://autotextsms.com/

NEFT, RTGS आणि IMPS म्हणजे काय

NEFT, RTGS आणि IMPS म्हणजे काय?

भारतात पैसे पाठवणे प्रक्रिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या देखरेखी खाली चालते. सध्या भारतात विविध प्रकारच्या पैसे पाठवणे प्रक्रिया अस्तित्वात आहेत. त्यात NEFT, RTGS आणि IMPS या प्रक्रियांचा समावेश होतो. बँकेत किंवा ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना तुम्ही NEFT, RTGS आणि IMPS बद्दल ऐकलं असेल. पण कधी तुम्ही विचार केलाय का, NEFT, RTGS आणि IMPS म्हणजे नेमकं काय आहे? त्यांच्यामधील फरक काय? चला तर आज जाणून घेऊया...

1) NEFT (National Electronic Fund Transfer):  भारतातील प्रमुख पैसे हस्तांतरणापैकी हि एक प्रणाली एक आहे. यात पैसे लगेच ट्रान्सफर होत नाहीत. यामध्ये प्रत्येक तासाचा टाइम स्लॉट बनवलेला असतो आणि त्यानुसार पैसे दुसऱ्याला पाठवले जातात. हे इलेक्ट्रॉनिक संदेशाच्या माध्यमाने वापरले जाते. नोव्हेंबर 2005 मध्ये ही प्रणाली सुरु करण्यात आली. ही सुविधा देशाच्या जवळपास 30000 बँकांमध्ये उपलब्ध आहे.


2) RTGS (Real Time Gross Settlement) : या माध्यमातून पैसे लगेच हस्तांतरीत करता येतात. या पद्धतीमध्ये OK बटण दाबल्यावर लगेच पैसे समोरच्याच्या खात्यामध्ये जमा होतात. त्यामुळे देशातील 95% देवाणघेवाण याच प्रणाली मधून होते. ही जगात सर्वात जास्त वापरली जाणारी प्रक्रिया आहे.

3) IMPS (Immediate Payment Service): यात एका बँक खात्यामधून दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे कधीही पाठवता येऊ शकतात. मोबाईलच्या माध्यमातून देखील या सेवेचा वापर करता येतो. NEFT आणि RTGS च्या वापरावर मर्यादा आहे, तर दुसरीकडे IMPS चा वापर मात्र दिवसाच्या 24 तासांत कधीही आणि सुट्टीच्या दिवशीही करता येतो. ह्या सेवेचे व्यवस्थापन NationalPayment Corporation Of India (NPCI) द्वारे केले जाते. भारतामध्ये 22 नोव्हेंबर 2010 रोजी सार्वजनिकरीत्या ही सेवा सुरु करण्यात आली.



IMPS सुविधा कशी वापरावी?

1) IMPS सुविधा वापरासाठी IMPS सुविधा पुरविणाऱ्या बँकेतील खात्यास मोबाईल क्रमांक नोंदवावा व बँकेकडून MMID मिळवावा. IMPS सुविधेसाठी नोंदणी केल्यानंतर बँकेकडून 7 अंकी क्रमांक देण्यात येतो त्याला MMID (Mobile Money Identifier) म्हणतात.

2) इतर बँकेमधून IMPS मार्फत रक्कम मागविण्यासाठी, IMPS नोंदणीवेळी बँकेत नोंदविलेला मोबाईल क्रमांक व बँकेमधून मिळालेला MMID रक्कम पाठविणाऱ्यास द्यावा. साधारणतः बँकांमध्ये IMPS व Mobile Banking सुविधा Android मोबाईलवर वापरण्यासाठी Application उपलब्ध करून देण्यात येत आहे.

NEFT आणि RTGS मध्ये फरक काय?

i) NEFT च्या माध्यमाने छोटे बचत खाते धारक पैसे हस्तांतरीत करतात. तर RTGS चा उपयोग मोठमोठ्या उद्योगसंस्था आणि कंपन्या करतात.

ii) NEFT मधून किमान पैसे पाठवण्याची मुभा असते, परंतु RTGS मधून कमीत-कमी 2 लाख रुपये हस्तांतरीत करणे अनिवार्य असते.

iii) NEFT मधून पैसे हस्तांतरीत होण्यासाठी वेळ लागतो. पण RTGS मधून पैसे त्वरित हस्तांतरीत होतात.

iv) NEFT च्या माध्यमातून बँकेच्या कार्यालयीन वेळातच पैसे ट्रान्सफर करता येतात. RTGS मध्ये लगेचच पैसे ट्रान्सफर होतात पण त्यादिवशी बँक चालू असणे गरजेचे असते.

NEFT आणि शुल्क

i) 1 लाखांपर्यंत  : 5 रुपये + सेवा कर

ii) 1 लाखांपेक्षा जास्त आणि २ लाखांपेक्षा कमी : 15 रुपयांपेक्षा जास्त नाही + सेवा कर

iii) 2 लाखांपेक्षा जास्त पैसे पाठवण्यासाठी :  25 रुपयांपेक्षा जास्त नाही + सेवा कर


RTGS आणि शुल्क

i) 2 लाख ते 5 लाखांपर्यंत देवाणघेवाण करण्यासाठी : प्रत्येक ट्रान्सफरला कमाल 30 रुपये.

ii) 5 लाख रुपयांपेक्षा जास्तची देवाणघेवाण करण्यासाठी : प्रत्येक ट्रान्सफरला कमाल 55 रुपये.

RTGS व NEFT प्रणाली मार्फत रक्कम पाठवण्यासाठी आवश्यक गोष्ट


i) पाठवायची रक्कम.

ii) इतर बँकेत जमा करावयाच्या खातेदाराचा खाते क्रमांक.

iii) लाभार्थी बँकेचे नाव.

iv) इतर बँकेत जमा करावयाच्या खातेदाराचे नाव.

v) रक्कम पाठवणा-या काढून स्वीकारणा-या साठी काही संदेश असेल तर.

vi) IFSC Code (आयएफएससी कोड - RBI द्वारे सर्व बँकांना व त्यांचा शाखांना ओळखण्यासाठी विशिष्ट प्रकारचा कोड नियुक्त केलेला असतो)

vii) रक्कम पाठवणा-याचा मोबाईल क्रमांक.

Labels

Find Us On Facebook

Latest Post

मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत

 दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती        इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्...