बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा , अपने मोबाइल से ऑटो sms भेजकर मार्केटिंग करे विजिट करे http://autotextsms.com/ बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा http://autotextsms.com/

Marathi emotional status

Marathi emotional status
Marathi emotional status, Marathi status, 

मराठी स्टेट्स, 


कुणी तरी मला विचारले, या
 जगात तुझ आपल एकदम जवळच अस कोण आहे,
 मि त्याला हसत उत्तर दिल,
  वेळ
जर का वेळ चांगली असेल तर सार जग आपल ,
आणि ती  जर खराब असेल तर कोणीच आपल नाही

स्त्री शक्ती


स्त्री शक्ती : प्रत्यकाने वाचावे असे काही 



छान आहे वाचा बर का...
" कारण तु घरीच असते !!!!!!! "

अगं ऐकलंस का.......?
आज बंटीची बस येणार नाहीए.
मला वेळ नाही.
त्याला शाळेतुन तुच आण.
कारण तु घरीच असते.....

अगं माझा मोबाईल चार्जर सापडत नाही,
battery low आहे,
तुझा फोन नंतर लाव.
तुझा चार्जर मला दे.
कारण तु घरीच असते......

आज मला लवकर office ला जायचे आहे ,
आधी पेपर मला दे.
तु नंतर कधीही वाच.
कारण तु घरीच असते.....

उद्या माझा boss येणार आहे.
पिंकीची exam आहे .
तिचा अभ्यास तुच घे.
कारण तु घरीच असते......

दोन/तीन दिवस खुप busy आहे .
Month end आहे.
आई - बाबांची औषधे तुच आण.
कारण तु घरीच असते ....

बंटी-पिंकीची अंघोळ,
त्याचा डबा, माझा नाश्ता,
तयारी आधी करत जा.
तुझी घाई मधेच कशाला?
कारण तु घरीच असते .....🙄

office मधे work load आहे.
मुलांच्या parents meeting ला
मला जमणार नाही.
तुच attend कर.
कारण तु घरीच असते ....

  ए आई, remote दे.
मला TV बघायचा आहे.
नंतर मला class आहे.
तु नंतर बघ ना ,तुझी serial repeat.
कारण तु घरीच असते .....🙄

आज colleague बरोबर
बाहेर जातोए जेवायला.
मुलांना तुच garden मध्ये घेउन जा .
कारण तु घरीच असते .....🙄

पुण्याचे मामा-मामी येताएत लग्नाला.
मी तर office मध्ये असतो, पण त्यांना म्हटलं उतरा आमच्या कडे.
कारण तु घरीच असते ....🙄

मुले शाळेतुन आल्यावर आज पावभाजी कर.
पिंकीचा वाढदिवस आहे ना !
आराम तर रात्री ही होईल.
जमलस तर cake पण कर.
कारण तु घरीच असते ....🙄

अग ऐकलंस का ?
खुप दमुन आलोय.
एक कडक चहा दे आणि
जेवायलाही लवकरच वाढ. होईल न स्वयंपाक पटकन ?
कारण तु घरीच तर असते....😟

घराबाहेर पडणाऱ्यांची
प्रत्येक गोष्ट प्रथम महत्त्वाची.
'ति'च्या प्रत्येक इच्छेला,
प्रत्येक  आवडीनिवडीला दुय्यम स्थान !!
कारण 'ती' घरीच असते.😳

खरंच का एवढ सोप्प आहे ?
घरी राहणं 😟 ?

आणि ..........................

 तीच जर घरी नसली तर

मग काय ?

मनाला भावलेली एक हळवी पोस्ट
सगळ्यांसाठी
समजून घ्या ,उमजुन घ्या .....


स्रियांचा सन्मान करायला शिका....कारण
 ती घरी असते म्हणून घर,  घर असते......

(संग्रहित...)

किती देखणी असतात ना नाती

किती देखणी असतात ना नाती


टोमण्याकडे दुर्लक्ष करून कौतुक करणारी आई
घोडा घोडा करणारे बाबा
बाळाला मांडीवर घेऊन बसणारी आत्या
न रागावता लाड करणारी मावशी
'मुलीला मांडवात घेऊन या' चा पुकारा झाल्यावर
डोळे भरून येणारे मामा

माहेरवाशिणीच्या गालावरून हात फिरवत
भरल्या आवाजात 'येत जा गं घरी' म्हणणारी काकू
 नि गाडी वरून फिरवायला नेणारा काका

सगळी गुपितं विश्वासानं शेयर करणारी मैत्रिण
आणि बाकी काही तक्रार नाही हो पण फार कमी जेवते तुमची मुलगी '
असं फोनवर सांगणारी
प्रेमळ सासू,

वटपौर्णिमेला न चुकता शहाळं आणणारा नवरा
आणि
'आमटी फक्कड झालीय गं
माझ्या आईची आठवण करून दिलीस' म्हणणारा
सासरा

ऑफीसातून परतल्यावर 'बस घटकाभर' म्हणत
वाफाळता चहा पाजणारे
आपल्या मुलांचा दंगा खपवून त्यांना सांभाळणारे
शेजारी

चेहरा पाहून नवरोजींचा मूड ओळखणारी पत्नी

मुलांत मूल होऊन क्रिकेट खेळणारे बाबा
आणि सुनेच्या सकाळच्या गडबडीच्या वेळी
नातवाला फिरवून आणणारे आबा

फेसबुकवर चिडवणारा
पण चांगल्या पोस्टला लाईक देणारा मेहुणा

इकडे तिकडे पळत हैराण करणार्या नातवाला
गरमागरम वरण भात मायेने भरवणारी
आजी

या सगळ्या सुख दुःखात सामील होणारा मित्र परिवार

किती सुखाचा, आनंदाचा असतो ना या सगळ्यांबरोबर होणारा आपला प्रवास...!!!
       
हसत  जगा  आयुष्य खूप सुंदर आहे...

नाती जोडा नाती जपा

(संग्रहित......)

व्यायामाला कोणताच पर्याय नाहीं

व्यायामाला कोणताच पर्याय नाहीं !!!

अत्यंत महत्वपुर्ण लेख

आरोग्याच्या बाबतीत समाजात अनेक 'लाटा' उसळत असतातb व कालांतराने त्या ओसरतात... त्याला आता सोशल मीडियाची जोड मिळाल्याने लाटा जरा जोरकस वाटतात...

पूर्वी गव्हांकूराची प्रचंड लाट होती...
प्रत्येक बाल्कनी - टेरेस - अंगणात गव्हांकुर पिकू लागले...
कॅन्सर, डायबेटीस.. बी.पी... गायब होणार
आणि
एकदम तंदुरुस्त होणार..

कैक टन गव्हांकुर संपले... मानसिक
समाधानापलीकडे विशेष काही घडले नाही व लाट ओसरली !

अल्कली WATER... ह्याची लाट तर जणू अमृतच मिळाले अशी होती....
म्हणाल तो रोग समूळ नष्ट होणार...
२० हजार - ३० हजार मशीनची किंमत...
मशीन्स धूळ खात पडली... लाट ओसरली !!

सकाळी उठल्या उठल्या मध-लिंबू-पाणी..
 वजन घटणार ...
बांधा सुडौल होणार..
हजारो लिटर मध संपले... हजार मिलीग्रामपण वजन नाही घटले...
लाट ओसरली !!!

मग आली नोनी फळाची लाट
नोनीने नानी आठवली
पण
तीही लाट नानी व नाना पार्क मधून वैकुंठाला घेऊन गेली

अलोव्हेरा ज्यूस... सकाळ संध्याकाळ प्या.. डायबेटीस, बी.पी. एकदम नॉर्मल होणार.. हजारो बाटल्या खपल्या... विशेष काही बदलले नाही... लाट ओसरली !!!!

मग रामदेव बाबांची बिस्किटे आली.
५०००करोड चा व्यवसाय झाला .
परिस्थिती आहे तीच.

मग माधवबागवाले आले . तेल मसाज पंचकर्म करा हृदयाचे ब्लॉक घालवा.
राहता ब्लॉक विकायला लागला पण हृदयाचा ब्लॉक गेला नाही.
(आता माधव बाग जाहिरात करतात की डायबिटीस पूर्ण घालवतो.)

मग आली दिवेकर लाट
मग आली दीक्षित  लहर

आता तर जग दोन भागात विभागले आहे

दार उल दिवेकर
आणि
दार उल दीक्षित

... ही लाट आता उसळ्या घेतेय... ओसरेल लवकरच !!!!!

लक्षात घ्या मंडळी, कुठच्याही गोष्टीबद्दल माझा पूर्वग्रह नाही वा आकसही नाही पण काळानुसार बिघडलेल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आपण भोगतोय

डोकं वापरा
आणि
Just एक पिढी मागे जाऊन आजी आजोबा कसे जगत होते हे आठवा

आणखी थोडं डोकं लावा
आयुर्वेद म्हणजे जगण्याचा वेद म्हणजे नियम शास्त्र.
रोजचे शाकाहारी जेवण पालेभाजी,वेलवर्गीय भाजी,फळभाजी,मोडआलेली कडधान्य,सँलड,साजुक तूप,बदलते गोडेतेल,गहूँ,ज्वारी,बाजरी,व मिश्रपिठाची भाकरी पोळी व सोबत थोडा व्यायाम पहा काय फरक पडतो .
लोकांना शिस्त नकोय..
जीभ चटावलीय..
पैसा बोलतोय... "स्वयंपाक नकोय..."

आता तर घरपोच...
पंधरा मिनीटात...

.....आली लाट मारा उड्या

हसत खेळत जगा, पण सर्वात महत्त्वाचे व्यायाम करणे आवश्यक आहे बस्स!!!

सकाळी लवकर उठणं,
रात्री लवकर झोपणं,
दुपारी थोडीशी विश्रांती घेणं आवश्यक आहे.

आपल्या प्रकृतीनुसार व्यायाम करणं सातत्याने आवश्यक आहे.

आपल्या कॉम्प्युटर,लॅपटॉप किंवा मोबाइलमध्ये व्हायरस शिरू नये म्हणून आपण जितकी काळजी घेतो, तेवढी काळजी आपण त्यापेक्षाही महत्त्वाच्या असणाऱ्या आपल्या शरीराची घेत नाही. तर  सुरुवात करायला काय हरकत आहे?

दिर्घायुष्य लाभावं,
आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी निर्माण होऊ नयेत,
या करीता आपला आहार,
आपलं राहणीमान योग्य असणं महत्वाचं आहे.

आपल्या प्रकृतीनुसार आहार घेण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीविरुद्ध आहार घेतल्यास शरिरात विकार निर्माण होतात.

या व्यायामात नियमितता व सातत्य असावं. दर दोन-तीन महिन्यांनी व्यायाम प्रकारात बदल जरूर करा.

आणि हो :-
या सर्वांसोबत मानसिक शांतताही राखा.
ताणतणाविरहित जीवन जगा. ध्यान, धारणा, योगासनं, प्राणायाम करा. ज्यामुळे तुम्ही नक्कीच  स्ट्रेस फ्री (stress free) राहू शकाल....

( संग्रहित....)

बहिणी

बहिणी.....​​

बहिणी
दुःख  वाटून घेणाऱ्या
सुख वाटत जाणाऱ्या

सल्ला देणाऱ्या
सल्ला घेणाऱ्या

खूप दूर
असल्या तरी
खूप जवळ
 असणाऱ्या

आपआपल्या
 संसारात मग्न
 असल्या तरी
मनाने आपल्याशी
 सतत संलग्न
 असणाऱ्या

स्वतःचे भरले डोळे लपवून
आपले अश्रु पुसणार्या.

शाबासकीची
पहीली थाप
पाठीवर देणाऱ्या .

खूप सुखात आहे ग मी
म्हणून हळूच डोळे पुसणार्या.

​​बहिणी
 आयुष्याला
मिळालेलं
 एक  वरदान.

जागेपणीचं
स्वप्न छान

पुस्तकातलं मोरपीस
जपणारं पान.

सप्तरंग उधळणारी
इंद्रधनूची कमान

मनातल्या
 फुलपाखराची
इवली भिरभिर
हळूवार हात
पुसतात डोळ्यातले नीर

उपसून काढतात
 हृदयात घुसलेला तीर

​​बहिणी
गातात नाचतात

खाऊ घालतात प्रेमाने
चटणी भाकरी ते
 गुलाबजाम.

त्या सुगरण
असोत  नसोत.
प्रत्येक  घास वाटतो
अमृताहून गोड.

बहिणीत नसतो भेदभाव
गरीबी श्रीमंती
लहान थोर
शहर गाव.

बहिण असते
एक सरीता
या हृदयापासून
त्या हृदयापर्यंत
वाहणारी.,,

(संग्रहित ....)

मुलीनी नक्की वाचावे असे काही

मुलीनी नक्की वाचावे असे काही , लग्न झालेल्या मुलींसाठी 



पहिल्यांदा नवऱ्यांच्या बाजुने आलेला लेख वाचला आणि तो ही एका स्त्री ने लिहिलेला...!

         १)तुम्ही तुमच्या आईबापाच्या काळजाचा तुकडा असता, तसा तुमचा नवराही खूप लाडाकोडात वाढलेला असतो.. त्यालाही कळा देऊनच आईने जन्माला घातलेला असतो.. तुम्हाला वाटतं तसं गटाराच्या बाजूने उचलून आणलेला नसतो..

         २)लग्नापर्यंत तो ही शिक्षण, करिअर, मित्रपरिवार यात छान बिझी असतो.. तेव्हा संसार करायचा त्याचा अनुभव तुमच्यासोबतच सुरु होतो..

        ३)आईबापाच्या संसारात तुमचा जितका नॉमिनल रोल असतो, तितकाच त्याचाही असतो.. त्याला सगळंच समजायला हवं ही अपेक्षा आणि त्याला काहीच समजत नाही हा तर्क दोन्ही अतिरेकी आहेत..

          ४)नवऱ्याची आर्थिक लायकी काढताना, आपल्या बापाने आपल्याला काय लाईफस्टाईल दिलीय ते बघावं.. आपण आपल्या हिमतीवर काय करु शकतो ते आजमावावं आणि मग विषय काढावा..

       ५)तुम्ही जसं उंची, अनुरुपता, पगार, स्थावर जंगम इस्टेट, घरातलं स्थान बघून लग्न करता तसं तो रुप, रंग, फिगर वगैरे बघून करतो.. व्यवहार आहे तो..! इमोशनल व्हायची गरज नाही.. तुम्ही ठोकून वाजवून लग्न करणार आणि त्याने बघताक्षणी हो म्हणावं असं होत नसतं..

       ६)तुम्हाला तुमची आई प्रिय आहे, तशी त्यालाही त्याची आई प्रिय आहे.. तुमच्या आईला जसा लेकीच्या संसारात इंटरेस्ट असतो, तसाच त्याच्या आईलाही असतो.. मुलगा म्हणजे काही देवीला सोडलेलं कोकरु नव्हे, विसरुन जायला.. तो मजेत आहे नं, त्याला काही त्रास नाही नं, हे वेळोवेळी त्याचे आईबाप चेक करणारच..

      ७)आणि परत एकदा, आपलं काय म्हणनं असेल ते समोरुन सांगावं.. मुलांना आईने 'मनातलं ओळखून दाखव बरं ' सारखे फालतू गेम्स शिकवलेले नसतात.. आणि हो, तुमच्या आईला त्याच्याकडून मान हवा असेल तर तुम्हीही त्याच्या आईशी नीट वागा..

        ८)तुम्ही तासन्तास आईशी बोलणार आणि तो दहा मिनीटं बोलला की, तुमचा जळफळाट होणार हे चालणार नाही.. तुम्ही यायच्या खूप आधीपासून आई आहे त्याच्या आयुष्यात.. तेव्हा शांत रहा.. या मुद्यावरुन फालतू ब्लॅकमेंलिंग करु नका..

      ९)सासुसासरे नक्कोच असतील तर अनाथ मुलाशी लग्न करावं..

      १०)आईबरोबरच मित्र व नातेगोते ही त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग असणार.. त्या बाबतीत अडवणूक नको..!!

         मित्रांनो खरंच अप्रतिम लेख आहे.. तुम्हालाही आवडला असेल तर अभिमानाने शेअर करा..!!
( संग्रहित: )

संधी मराठी बोधकथा




संधी मराठी बोधकथा


सुंदर बोध

संधी

 एक दानशूर राजा होता.त्यानं एक दिवस जाहिर केलं की,उद्ध्या माझ्या महालाचा मुख्य दरवाजा उघडला जाईल.त्या . नंतर ज्याला जी वस्तू हवी असेल,त्यानं फक्त त्या वस्तूला हात लावायचा. दुसरा दिवस उजाडला,सर्व लोक राजवाड्यात शिरले,गर्दी जमली.प्रत्येकजण आपल्याला हवी असलेली वस्तू शोधायचा, कुणी सोने घेतले,कुणी पैसे,कुणी घोडा तर कुणी दुभती जनावरे. राजा एका कोप-यात थांबून हा सर्व प्रकार पाहात होता.अचानक,त्याचं लक्ष एका चिमुकलीवर गेलं.ती गर्दीतून वाट काढत हळूहळू राजाच्या दिशेने येत होती.राजा पहात असतानाच ती त्याच्याजवळ पोहोचली आणि तिने आपल्या नाजूक हातांनी राजाला स्पर्श केला.क्षणार्धात राजा तिचा झाला.राजाच तिचा झाल्यामुळे तिथल्या सर्व वस्तूदेखील तिच्या मालकीच्या झाल्या.

विचार करा
ज्या पध्दतीने राजाने लोकांना संधी दिली होती त्याच पध्दतीने परमेश्वर आपल्या प्रत्येकाला रोज संधी देतो.पण,त्या लोकांसारखीच आपली चूक होते,परमेश्वराऐवजी आपण,त्याने निर्मिलेल्या प्रापंचिक वस्तू निवडतो.पण,देवच जर आपला झाला तर संपूर्ण जगच आपले होईल, खरंय ना.....!

पुणेरी जोक्स मराठी









पुणेरी जोक्स मराठी

हसत-हसत शेअर करा


एक स्त्री आणि एक पुरूष दोघांच्या गाडीचा अपघात होतो.

चूक स्त्रीची असते.

ती अचानक मध्ये आलेली असते.

सुदैव हे की दोघांच्या गाड्यांचे बरेच नुकसान झालेले असते,

तरी दोघांना किरकोळ खरचटणे सोडून मार लागलेला नसतो.

दोघं कसे तरी बाहेर येतात.

पुरूष काही बोलणार इतक्यात ती स्त्री पर्समधून नवी कोरी
क्वार्टर काढते.

"मला माहीत आहे, आपण दोघंही या घटनेने
हादरलो आहोत.

जरा शांत होऊ या आणि मग बोलू.

घ्या जरा दोन पेग मारा, मी पण घेईन आणि मग
ठरवू काय ते".

पुरूष क्वार्टर हातात घेऊन अर्धी पिऊन स्त्रीला परत करतो.

ती स्त्री शांतपणे बाटली परत पर्स मध्ये ठेवते.

"तुम्ही नाही घेणार?" तो विचारतो.

"नाही" स्त्री उत्तरली
.
.
.
.
.

"आता आपण पोलिसांची वाट पाहू या.

तेच ठरवतील दोष कोणाचा आहे ते."

(ती बाई पुण्यात वकील असते)

आता बसा बोंबलत.....
आरं किती घाई प्यायची

हिऱ्याची गोष्ट मराठी motivatiom

एक बाई मोलकरीण म्हणुन एका राजमहालात काम करत असते.
तिला लहान मुलगा असल्याने ती त्याला तिच्या सोबतच कामाला येतांना घेऊन यायची.
एक दिवस त्या मुलाला खेळता खेळता राजमहालात हिरा सापडतो,
तो मुलगा तो हिरा घेऊन पळत आईकडे जातो आणि सांगतो की, "आई बघ मला हिरा सापडला !"
मोलकरीण हुशार असते.
तिला वाटते, हा हिरा घेऊन आपण राजमहालाबाहेर जाऊ शकणार नाही !
ती मुलाला म्हणते, "नाही रे ! काच आहे, हा हिरा नाही.", असे म्हणुन ती तो हिरा बाहेर फेकुन देते.
काम आटोपल्यावर जेव्हा ती घरी जायला निघते तेव्हा ती तो हिरा सोबत घेऊन जाते.
मग ती तो हिरा सोनाराकडे घेऊन जाते. सोनाराला कळतं की, हिला हा हिरा कुठंतरी सापडला असणार,
हिला काय माहीत ? हा हिराच आहे ! म्हणुन तो सोनार तिला म्हणतो, "हा हिरा नाही, ही तर काच आहे!"
आणि असे म्हणुन तो पण तो हिरा बाहेर फेकुन देतो.
जेव्हा ती घरी जाते तेव्हा तो सोनार बाहेर जाऊन तो हिरा घेऊन येतो व जोहरीकडे घेऊन जातो.
जोहरी हिरा पाहतो, त्याला कळतं हा हिरा अनमोल आहे, त्याची नियत खराब होते.
तो हिरा घेतो आणि बाहेर फेकुन देतो आणि "काच आहे", असं म्हणतो.
जसा हिरा बाहेर पडतो तसे त्याचे तुकडे तुकडे होऊन जातात. हे सगळं एक वाटसरु लांबुन पहात असतो.
तो त्या हिऱ्याजवळ येतो आणि त्याला म्हणतो, "मोलकरीण आणि सोनार ह्या दोघांनी तुला दोन वेळा फेकलं तेव्हा तु तुटला नाही,
पण आता का तू तुटला ?"
हिरा म्हणतो, "जेंव्हा मोलकरीण व सोनाराने मला फेकले तेव्हा ते माझी खरी किंमत जाणत नव्हते.
परंतु जोहरी तर माझी किंमत जाणत होता तरी त्याने मला फेकले !
हा आघात मी सहन करुच शकलो नाही,
म्हणुन मी तुटलो."
मनुष्याच्या बाबतीत असेच होत असते, जे तुम्ही काय आहे हे जाणुन पण तुमचं मन तुडवतात तेव्हा तो आघात सहन करु शकत नाही.
म्हणुन कधीही आपल्या लोकांचं जराश्या स्वार्था करता मन तोडु नका...
आपल्या आजुबाजुची खुप सारी आपली माणसं
हिऱ्यासारखी असतात, त्यांच्या भावना व मन दुखवून त्यांच्या चांगल्या गुणांचे तुकडे तुकडे करू नका....

📚 गोष्ट (संकलित)

जीवनात सुखी राहण्याचे उपाय









मराठी संत वचन
जीवनात सुखी राहण्याचे उपाय




१) दुसऱ्याच्या भानगडीत नाक खुपसू नका :
अनेकदा आपण दुसऱ्याच्या भानगडीत वरचेवर नाक खुपसून स्वत:च गोत्यात येत असतो. अर्थात याला कारण असते “माझा मार्गच बरोबर आहे , माझ्या विचाराची दिशाच योग्य आहे आणि जे याच्याशी सहमत नाहीत त्यांच्या गळी आपले म्हणणे कसेही करून उतरवले पाहिजे” ही विचारसरणी. ही विचारसरणी दुसऱ्या व्यक्तीचे अस्तित्वच अमान्य करते, तसेच देवाच्या अस्तित्वालाच आव्हान देते. प्रत्येक व्यक्तीची जडणघडण वेगळी आहे, दोन माणसे एकच विचार किंवा कृती करतील असे होत नाही. देवाने जशी बुद्धी दिली आहे तसा प्रत्येकजण विचार करीत असतो. आपले काम ध्यान देवून केले तरी खूप झाले !

२) क्षमा करा आणि विसरून जा:
मन:शांती मिळविण्याचे हे खूप प्रभावी तत्व आहे. आपला अपमान करणाऱ्या वा आपल्याला दुखविणाऱ्या व्यक्तीचा आपण आतून राग राग करीत राहतो, सूडभावना जोपासतो. यातूनच मग निद्रानाश, पोटाचे विकार, अति-रक्तदाब असे विकार जडतात. आपला अपमान तर एकदाच झालेला असतो पण सूडभावना धगधगत मात्र कायम राहते. सूडभावना सोडा. आयुष्यात करायच्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत, सूडाने जळत राहून आपलेच आयुष्य का जाळायचे ? झाले गेले गंगेला मिळाले या उक्तीप्रमाणे वागा.

३) स्तुतीपुंजक बनू नका :
जगात सगळीकडे नुसता स्वार्थ भरलेला आहे. तोंडपुंजेपणा करणारे का कमी आहेत ? आज तुमची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणारे संधी मिळताच तुमच्यावर चिखलफेक करतील. तेव्हा मला मोठा म्हणा हा अट्टाहास का ? तुमच्या भोवती दिवे ओवाळणाऱ्यांना
जराही महत्व देवू नका. तुमचे काम नीतीची चाड न सोडता आणि प्रामाणिकपणे करीत रहा.

४) द्वेष करू नका :
द्वेष करणाऱ्यांमुळे मनाची शांती कशी बिघडते याचा अनुभव प्रत्येकाने घेतला असेलच. असेही होते की कामात अधिक मेहनत घेवून सुद्धा बढती मात्र भलत्यालाच मिळते. धंद्यात सुद्धा आपला पुरेसा जम बसत नसताना नव्याने शिरकाव केलेला बस्तान बसवितो. असे अनेकदा होतच असते. यासाठी आपण द्वेषभावना जोपासायची का ? नाही. प्रत्येकाच्या कपाळावर सटवाईने जे लिहिले आहे ते होणारच आहे, ज्याला यश मिळाले ते त्याचे विधीलिखित होते. विधीलिखित टळू शकत नाही, कोणी ते बदलू शकत नाही किंवा त्यापासून कोणी पळू शकत नाही. तुमच्या नशिबात एखादी गोष्ट नाही त्याला दुसऱ्याला दोष देण्यात काय हशील ? द्वेष करून काहीही साध्य होणार नाही उलट त्या आगीत तुमच्या मनाची शांतीच राख होऊन जाईल.

५) प्रवाहाबरोबर चाला:
तुम्ही एकटे प्रवाहाची दिशा नक्कीच बदलू शकणार नाही. यात बुडायची शक्यताच जास्त. त्यापेक्षा प्रवाहाबरोबर गेल्यास तुम्हाला अकस्मात प्रवाहाबरोबर जुळवून घेता घेताच आगळ्या एकात्मतेची प्रचीती येइल.

६) संकटांचा धैर्याने मुकाबला करा :
प्रत्येक अपयश ही पुढील यशाची पायरी असते. दर दिवशी आपण अनेक अडथळ्यांचा, व्याधींचा, उद्रेकाचा, अपघातांचा सामना करीतच असतो. यावर जेव्हा काही उपाय सापडत नसतो तेव्हा काही वेळ संकटांशी जुळवून घ्यायला शिका. या सगळ्यांना खंबीरपणे तोंड द्या. संकटांसमोर शरणागती पत्करून उमेद जगण्याची हरवून बसू नका. स्वत:वर विश्वास ठेवा. धैर्य, आंतरिक शक्ती आणि दांडगी इच्छाशक्तीच तुम्हाला विजयाजवळ नेईल.

७) *अंथरूण पांघरून हातपाय पसरा* :
ही म्हण खरेतर कायमच लक्षात ठेवायला हवी. आपण आपली क्षमता न ओळखता खोट्या मोठेपणासाठी नको ती जबाबदारी डोक्यावर घेत असतो. याने आपला अहंकार कुरवाळला जातो. आपल्या मर्यादा ओळखायला शिका. नाकापेक्षा मोती जड अशी अवस्था का करून घ्यायची ? भौतिकसुखाच्या मागे लागल्यास मन:शांती कधीही मिळणार नाही.भौतिक सुखाच्या मृगजळामागे न धावता तो वेळ प्रार्थनेला द्या, स्वत:च्या आत डोकावून बघा, ध्यान करा. याने तुमचे चित्त टाळ्यावर येईल. निर्मळ मन तुम्हाला अधिक मानसिक समाधान देईल.

८) नित्यनेमाने ध्यानधारणा करा :
ध्यानाने मन शांत होते व अस्वस्थ करणाऱ्या
विचारांपासून तुमची सूटका होते. यातून तुम्ही परमशांती प्राप्त करू शकता.प्रामाणिकपणे रोज अर्धा तास जरी ध्यान केले तरी बाकी साडेतेवीस तास तुमचे मन प्रसन्न राहील. या ना त्या कारणाने ढळणारा मनाचा तोल सावरेल. ध्यानाचा वेळ थोडा थोडा वाढवित नेल्यास अधिक समाधान मिळेल. तुम्हाला असे वाटणे स्वाभाविक आहे की ध्यानधारण करीत बसल्यास बाकीची कामे रेंगाळतील. पण या उलट तुमची कार्यक्षमता वाढून तुमची सर्व कामे अधिक कुशलतेने तुम्ही कमी वेळात करू शकाल.

९) मनाला कोठेतरी गुंतवून ठेवा :
इंग्रजीत “An Empty Mind is Devil’s Workshop” असे म्हणतात. रिकाम्या मनात जगातले सगळे वाईट विचार येतात. मन चिंती ते वैरी न चिंती. काहीतरी सकारात्मक, विधायक कार्य करण्यात मनाला गुंतवून ठेवा.एखादा छंद जोपासा. तुम्हाला आवडणारे काहीतरी करा. पैसा की समाधान यात तुम्हाला काय जास्त प्रिय ते एकदा ठरवा.तुम्ही जोपासलेला छंद किंवा समाजसेवा, देवाधर्माचे काम यातून तुम्हाला पैसा मिळेलच असे नाही पण भरून पावल्याचे , काही केल्याचे समाधान मात्र नक्कीच मिळेल.अगदी शरीर थकल्याने विश्रांती घेत असाल तेव्हा सुद्धा काही चांगले वाचा नाहीतर नामस्मरण तरी करा.

१०) धरसोड वृत्ती सोडा , खंत करू नका:
“करू की नको” असा विचार करीत राहिल्यास कृती काही होणार नाही मात्र दिवस, आठवडे, महिने, वर्ष वाया जाईल व डोक्याला ताप मात्र होईल. नियतीने तुमच्या पुढ्यात काय वाढलेले आहे याचा थांगपत्ता तुम्हाला कधीही लागणार नाही. तेव्हा उगीच घोळ न घालता ज्या वेळी जे करणे योग्य आहे त्या वेळी ते करा. जरी अपयश आले तरी त्यातूनच तुम्हाला मार्ग सापडेल. डोक्याला हात लावून बसाल तर मात्र कार्यनाश होणार. तसेच भूतकाळातली मढी उकरू नका. जे झाले त्याची खंत बाळगू नका. जो हो गया सो हो गया ! तकदीर मे लिखा था वही हुवा ! कोळसा कितीही उगाळला तरी काळाच ! सकारात्मक दृष्टीकोन बाळगा !


x

Labels

Find Us On Facebook

Latest Post

मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत

 दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती        इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्...