बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा , अपने मोबाइल से ऑटो sms भेजकर मार्केटिंग करे विजिट करे http://autotextsms.com/ बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा http://autotextsms.com/

एका वडिलांनी मुलाला पत्र



नक्की वाचा आणि पटलं तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही वाचायला द्या. फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा वाचा आणि पुन्हा पुन्हा वाचायला सांगा.....पुन्हा पुन्हा एवढ्यासाठी कि ज्यावेळी जसा मूड असेल तसा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ समजून येईल._


"माझ्या लाडक्या मुला.मी हे असं तुला पत्र लिहितोय बघ, वाच, आणि ठरव....


           जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाही. सगळंच अर्त्यक्य आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणी सांगू नाही शकत. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या बऱ्या.
     
        मी बाप आहे तुझा, मी तुला जे सांगेन ते इतर कुणी कदाचित कधीच नाही सांगणार.
     
         मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट, जिवाचे चटके आणि मनाचा त्रास बराच कमी होईल, म्हणून काही गोष्टी तुला सांगतोय.
   
            माणसांविषयी मनात आकस ठेवू नको, कुणाचा द्वेष करू नकोस. तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती नाही करू शकत. त्यामुळे ते असंच का वागतात असं म्हणून तणतणू नको. तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे._ _तेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात, त्यांच्याशी चांगलं वाग. पण हे कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतूपोटी करतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी कायम चांगलीच वागतात त्यांना तू खरंच आवडतो असं काही नसेलही. जरा माणसं तपासून बघ, पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई करू नकोस.

     
         जगणं कशानेच कुणामुळेच थांबत नाही. त्यामुळे माणसं तुला सोडून जातील. नाकारतील, झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलंस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील. तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की, कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नाही. कधीच नाही.

       आयुष्य फार छोटं आहे आणि तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे आज वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणंच तुला सोडून जाईल. त्यापेक्षा आज मनापासून, भरभरून जग. आनंदी राहा.

         प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणोही बदलते. ज्यांच्यावर तू जिवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर. काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतील. प्रेमात पडलास म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतीव चांगलं असं समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दु:खालाही जास्त कवटाळून बसू नकोस.

      अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं, तरी ते यशस्वी झाले अशा कहाण्या तू वाचल्या असशीलच ! पण याचा अर्थ असा नाही की, एक शिक्षण सोडलं की तूही यशस्वी होशील. नॉलेज, ज्ञान हे एक शस्त्र आहे हे लक्षात ठेव. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरंय, पण कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना.

माझी  अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला सांभाळावंसं. मीही तुला जन्मभर पोसणार नाहीच. तू स्वत:च्या पायावर उभा राहू शकशील तोर्पयत तुला सपोर्ट करणं ही माझी जबाबदारी. त्यानंतर तुला बसमधून फिरायचं की लिमोझीनमधून, गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तू घ्यायचा._

      आणखी एक, मीही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं, ते कधीच लागलं नाही. एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही. श्रीमंत व्हायचं तर मेहनत करावीच लागते. जगात फुकट कधीच काहीच मिळत नाही.

            तुझा पप्पा

शेतकऱ्यासाठी एक पोस्ट : जुगार नक्की वाचा



पहिल्याच दिवशी वर्गामध्ये सरांचेआगमन झाले.
ओळखीचे सत्र सुरु करण्यात आले.
तुमचे नाव काय.....?
तुमचे गाव काय....?
असे प्रश्न विचारण्यात आले....
कुणाचे बाबा वकील, डॉक्टर तर कुणाचे
इंजिनीअर.....
माझा नंबर येताच...
.
मी पटकन उभा राहिलो व चटकन सांगितले
“सर, माझे बाबा शेतकरी आहेत.”
मी असं म्हणताच सगळा वर्ग
हसायला लागला.....
मला याचा फार राग आला.....
.
मी म्हटले “सर मी नाही म्हणत,
या साऱ्यांचा धंदा छोटा हाय,
पण,....या काळ्या आईची शपथ
सर...या साऱ्याहून
माझा बाप मोठा हाय....
हाडाची काडं करून रात दिन राबत
असतो,

तो राबतो म्हणून तुम्ही आम्ही दिसतो...
काड्याकुड्याचं जिनं त्याचं
पण,
साऱ्या जगाला भाकर देतो..
अन् साऱ्या जगाला भाकर देणारा,
कधी कधी उपाशीच झोपतो
माहित नसताना पाऊस येईल-नाही येईल,
हजारो रुपये मातीत गाळतो,
खरंच सर तो मातीसंग जुगारच खेळत असतो.
सगळे जण जगण्यासाठी जुगार खेळतात
पण,
माझा बाप जगवण्यासाठी जुगार खेळतो.
अन्,
या जगण्याच्या जुगारीमध्ये तो नेहमीच हरतो.
माणुसकीच्या गावामध्ये अजून त्याची वस्ती हाय,
खरंच सर माझ्या बापाची मरणा संग दोस्ती हाय....
फाटके तुटके कपडे सर
तो अजूनही अंगावर घालतो....,
पण,
सर मला तुमच्या कपडयाचाही
त्याचाच घामाचा वास येतो.
टाकून पहा मातीत सर तुम्ही
पाच-पन्नास हजार, तेव्हाच तुम्हाला कळेल,
त्याच्या जगण्याचा जुगार.
म्हणून,
म्हणतो सर अभिमान हाय मला
माझा बाप शेतकरी असल्याचा
अभिमान आहे मला
मी या शेतकऱ्याचा वारस असल्याचा
जग लिहिते आईसाठी,
जग लिहिते साऱ्यांसाठी पण,
मी लिहितो बापासाठी, त्याच्याच
जीवनाचा जुगार........”
दारूचा स्टाॅक संपत नाही
तंबाखू-शिगरेट चा स्टॉक संपत नाही
ऐवढच काय तर गुटका बंदी असुनही गुटक्याचा स्टॉक
कधी संपत नाही.
तर मग ऐण पेरणीच्या दिवसात खता-बियांण्याचा
स्टॉक कसा काय संपतो......?
आणी वाढीव पैसे देताच लगेच कसा काय उपलब्ध
होतो.....
दलाल व्यापार्यांनो पुरे करा हा हरामखोरपणा.....
.

बस करा आता शेतकर्यांना लुबाडुन खाणं. ....
कारण,
ज्या दिवशी आम्हा शेतकर्यांचा अन्नधान्याचा
स्टाँक संपेल ना
तेव्हा तुम्हाला भिक पण मिळणार नाही.
सर्वानसाठी पोस्ट केला पन
जगाचा पोशिंदा शेतकऱ्यासाठी एक पोस्ट
मनापासून पटल तर शेअर करा.
.
कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा,
रात्रभर झोप नाही येणार.
विचार करा शेतकऱ्याच कस होत असेल !!

लक्ष्मी आणि विष्णू संवाद



लक्ष्मी म्हणते:- 'जग सर्व पैशावर चालले
पैसा नाहीतर काही नाही म्हणून
मलाच किंमत'.


विष्णू:- सिद्ध करुन दाखव.

लक्ष्मी एक पृथ्वीवरील दृश्य
दाखवते अंतयात्रा चाललेली असते,
लक्ष्मी वरुन पैशांचा वर्षाव करते, सर्व लोक
प्रेताला सोडून पैसे जमा करायला धावतात.
लक्ष्मी विष्णूंना म्हणते कि बघा बघितलं
पैशाला किती किंमत आहे !!

विष्णु:- प्रेत नाही उठले पैसे जमा करायला?

लक्ष्मी:- प्रेत कसे उठणार तो मेलाय !

विष्णूंनी खूप सुंदर उत्तर
लक्ष्मीमातेला दिले:- 'जो पर्यंत
मी शरीरात आहे तो पर्यंतच तुला ह्या जगात
किंमत आहे.
ज्या क्षणी मी ह्या शरीरातून
जाईन तेव्हा पैसा मातीमोलच'.... नाते सांभाळायचे असेल तर..
चुका सांभाळून घेण्याची
मानसिकता असावी ...
आणि
नाते टिकवावयाचे असेल तर ..
नको तिथे चुका काढण्याची
सवय नसावी ....


ताकद आणि पैसा हे
जीवनाचे फळ आहे
परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम हे
जीवनाचे मुळ आहे।

: रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही
ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा आपला प्रयत्न असतो.
तसेच,
आपले जीवनही पुसले जाणार आहे
हे माहीत असूनही आपण ते रांगोळीप्रमाणेच जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

माणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो.. कर्म चांगले पाहिजे.
प्रत्येक माणूस आप-आपल्यापरीनं निसर्गाची
'एकमेव अप्रतीम कलाकृती' असतो..

कधीही कोणाची कोणाशी तुलना करू नये..अगदी स्वतःचीही..!!      

कर्म व त्याचे परिणाम

एक ब्राह्मण दुपारी भिक्षा मागण्याकरीता एका दारात उभा राहीला , ''ॐभवती भिक्षांदेहि " अशी गर्जना केली.

घरात एकटीच म्हातारी होती, ती म्हणाली, "महाराज ! मी एकटीच आहे, घरात आमटी भात तयार आहे, चार घरात भिक्षा मागण्या पेक्षा आज इथेच जेवा."

ब्राह्मण "हो" म्हणाला

 ब्राम्हणाचे पोटभर जेवण झाले ब्राम्हणाने ताक मागीतले.

*भोजनांते तक्रं पिबेत* अस म्हणतात.

नेमकं म्हातारीच्या घरात त्या दिवशी ताक नव्हते.

ती म्हणाली, "थांबा महाराज मी आत्ता शेजारणी कडून ताक घेवुन येते."


तिने शेजारणीला ताक मागीतले , शेजारणीने भांडभर ताक दिले,

आजीने ब्राम्हणाच्या भातावर ताक घातले , ब्राम्हणाने भुरका मारला तो शेवटचाच.
ब्राह्मण तडकाफडकी मेला.

चित्रगुप्त आणि यमधर्माला प्रश्न पडला की, या कर्माचा भागीदार कोण?

 कारण ब्राम्हणाने आत्महत्या केली नव्हती.

म्हातारीने अतिथीधर्म पाळला होता तिने ब्राम्हणाला मारले नव्हते,दारात आलेल्या अतिथ्याला पोटभर जेवण दिले होते.

शेजारणीने शेजारधर्म पाळला होता कोणी दारात मागायला आले तर नाही म्हणू नये म्हणून तिने ताक दिले होते. आणि ताक पिवुन ब्राह्मण मेला होता कारण त्या ताकात विष होते आणि हे विष एका नागाच्या तोंडातून ताकात पडले होते.

यमधर्माने नागाला जाब विचारला, नाग म्हणाला यात माझा काय दोष ? घार मला पकडून आकाशमार्गे चालली होती,माझे तोंड खाली झाले होते त्यामुळे माझ्या तोंडातील गरळ त्या ताकात पडली म्हणून ब्राह्मण मेला.

यमाने घारीला जाब विचारला , घार म्हणाली यात माझा काय दोष ? सापाला पकडून खाणं हा माझा धर्म आहे.

प्रत्येकाने आपला धर्म पाळला होता मग आता कर्माचा भागीदार कोण ? कोणाच्या माथी मारायचे हे कर्म ?

चित्रगुप्त यमाला म्हणाला, "चला माझ्याबरोबर या कर्माचे भागीदार मी तुम्हाला दाखवतो."

 दोघेही गुप्तरूपाने ब्राम्हण मरून पडला होता तिथे आले.

 हा!हा! म्हणता संपूर्ण गावात बातमी पसरली की, म्हातारीच्या घरी ब्राह्मण जेवता जेवता मेला.

हळुहळु आळीतल्या बायका तिथं जमल्या.

 शांताबाई उज्वला ताईना म्हणाल्या, "काय हो उज्वलाताई ब्राम्हण कसा मेला कळले का हो ?"


 उज्वलाताई म्हणाल्या, "नाही हो"

 तेंव्हा शांताबाई म्हणाल्या, "आहो कसं सांगु s s s तुम्हाला , या ब्राम्हणाकडे भरपूर द्रव्य होते , म्हातारीने भोजनात विष घालून त्याला ठार मारले व त्याचे द्रव्य हडप केले."

 चित्रगुप्त यमाला म्हणाला पहिल्या क्रमांकावर हिचे नाव लिहा.

आणि तिथे जे जे या घटनेबद्दल बोलत होते त्यांची नावे रजिस्टर मधे लिहुन त्यांच्या माथी मारले गेले.

 थोडक्यात कर्माचा इतका सूक्ष्म विचार केला आहे. एखाद्या घटने बद्दल सत्य माहीत नसताना बोलणे हे सुद्धा पाप आहे.

म्हणून आजचा सुबोध दिला आहे.
प्रत्येकाच्या कानात आणि डोळ्यात देवाने चार बोटाचे अंतर ठेवले आहे.

 त्याचे कारण *जोपर्यंत एखादी घटना तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही तो पर्यंत कोणाच्या तरी तोंडून निघालेली बातमी कानाने ऐकून तुमच्या तोंडाने बोलू नका हे सुद्धा एक प्रकारचे पापच आहे.*
*माणसाचे " मी "बरेच नुकसान करतो*
*मी* का बोलू ?
*मी* का फोन करू ?
*मी* का कमीपणा घेऊ ?
*मी* का नमते घेऊ ?
*मी* का नेहमी समजून घ्यायचं ?
*मी* काय कमी आहे का ?
असे बरेच सारे *"मी"* आहेत
जे आयुष्यात विष कालवतात.
*म्हणून मी पणा सोडा व नाती जोडा.*
=============================
*" आयुष्य खुप सुंदर आहे "

स्वतः ला हुशार समझत असाल तर नक्की वाचा





```
एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती ...

तिथल्या स्थानिक राजाने एकदा चर्चा करायला त्याला बोलवले,

भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा  म्हणाला " महाशय
तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ?




काही त्याला शिकवा.

त्याला सोने आणि चांदी यात
जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही "

आणि

मोठ्याने हसू लागला ....

हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ...

तो घरी गेला ....

त्याने मुलाला विचारले
" बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "

" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला

" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?

म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!

 माझी चार लोकात खिल्ली उडवली जाते ..

तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!!



मुलगा म्हणाला
राजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ...

रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहे

मी दिसताचं राजा मला बोलावून घेतो ..

त्याच्या सोबत गावातील
सारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात ....

राजा एका हातात
सोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोर धरतो आणि मला सांगतो "यातले सगळ्यात किमती नाणे उचल" ..

आणि
मी रोज चांदीचे नाणेच उचलतो ..

त्यामुळे तिथे असलेले सगळे
मोठ्याने हसतात ...

सार्यांना मजा वाटते .......आणि असे रोज घडते

हे ऐकल्यावर विद्वानाला प्रश्न पडतो की आपल्या मुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतो

चांदीचे नाणे मुल्यवान म्हणून का उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही

न राहून त्याने मुलाला विचारले "मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाहीस ? असला मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"

मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला घराच्या आत घेवून गेला
कपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली. ती पेटी चांदीच्या नाण्यांनी पुर्ण भरलेली होती ...

हे पाहून विद्वान अवाकचं झाला ..

मुलगा म्हणाला
 "पिताश्री ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी राजा हा खेळ बंद करेल ..

 त्यांना जर मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेल तर येवू द्या ..

पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही.

मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "

सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा !!!

 काय वाटते ????

*समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो*

*काहीजण त्यातुन मोती उचलतात*,

काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.

*हे विश्व पण सर्वांसाठी* सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे..
नक्की forward करा, खूप छान मेसेज आहे```

गरज हि माणसांनमधे क्षमता निर्माण करते नक्की







एकसारख्या दिसणाऱ्या दोन घरांमध्ये दोन वेगवेगळ्या व्यक्ती रहात होत्या. पहिल्या घरामध्ये एक सेवानिवृत्त आजोबा आणि दुसऱ्या घरामध्ये गलेलठ्ठ पगाराचा आय. टी. इंजिनिअर.
          घराच्या कुंपणासाठी एकाच प्रकारची शोभेची झाडं दोघांनी लावली होती. इंजिनिअर साहेब आपल्या झाडांना भरपूर पाणी आणि खत देत असे. आजोबा मात्र फारचं थोडं पाणी आणि खत देत असत. इंजिनिअर साहेबांची झाडं एकदम भरगच्च आणि घनदाट वाढली होती, आणि आजोबांची झाडं टुमदार, छान अंग धरून होती.
          एका रात्री अचानक जोराचा वारा आणि पाऊस आला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेमकं काय घडलाय हे पाहायला दोघेही घराबाहेर आले. समोरच चित्र पाहून इंजिनिअर साहेबांना धक्काच बसला. कारण त्यांची सर्व झाडे अगदी मुळापासून उखडून पडली होती आणि आजोबांची मात्र छान शाबूत होती.
          इंजिनिअर साहेब विचारात पडले, भरपूर पाणी आणि मुबलक खत देऊनसुद्धा एका साध्या वाऱ्यात आणि पावसात माझ्या झाडांची अशी दशा आणि गरजेपेक्षा कमी गोष्टी मिळणाऱ्या आजोबांची झाडे जशीच्या तशी. शेवटी न राहून इंजिनिअर साहेबांनी आजोबांना याचे कारण विचारले.
          त्या निवृत्त आजोबांचे उत्तर म्हणजे आजच्या सर्व पालकांसाठी खूप मोठी शिकवण आहे.




          आजोबा म्हणाले "इंजिनिअरने झाडांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरविल्या पण अति प्रमाणात आणि त्यामुळेच झाडांची मुळे पोषणाच्या शोधार्थ खोलवर गेली नाहीत. तेच मी माझ्या झाडांना गराजेपुरतेच किंवा थोडे कमी खत आणि पाणी दिले, त्यामुळेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाडांची मुळे खोलवर गेली. इंजिनिअर साहेबांच्या झाडाची मुळे खोलवर गेली नसल्याने थोड्याश्या वाऱ्याला आणि पावसाला बळी पडले. माझ्या झाडांची मुळे खोलवर गेल्याने त्यांना मजबुती मिळाली आणि वाऱ्याला आणि पावसाला न जुमानता माझी झाड मस्त उभी आहेत."

          आपल्या मुलांच्या बाबतीतही असेच असते.

माणुसकीचा झरा

एकदा  नककी share कराल






एकदा एक माणूस मॉर्नींग वॉकसाठी बाहेर पडला होता. परत येताना त्याला रस्त्यावरील एका खांबावर एक चिठ्ठी घडी करून अडकवून ठेवलेली दिसली. त्याने कुतुहलाने ती चिठ्ठी उलगडून वाचायला सुरवात केली. ती चिठ्ठी बर्‍याच वेडावाकड्या अक्षरांमध्ये लिहिली होती. त्या चिठठीतील मजकूर असा होता.

‘माझी 50 रुपयांची नोट हरवली आहे. मी एक गरीब आणि वृद्ध महिला आहे. ही नोट इथेच कुठेतरी पडली असावी. मी ती नोट शोधायचा प्रयत्न केला पण मला काही ती नोट सापडली नाही. ज्या कुणाला ही नोट सापडेल त्याने ती नोट खालील पत्यावर पोचवण्याची कृपा करावी.’

त्या चिठ्ठीच्या शेवटी पत्ता दिला होता आणि ‘गणपतीच्या देवळाजवळ’ अशी खुण पण सांगीतली होती.

त्या माणसाला काय वाटले कोणास ठाऊक. तो पत्ता शोधत निघाला. हा पत्ता एका गरीब झोपडपट्टीतला निघाला. त्याने त्या वस्तीतील गणपतीचे देऊळ शोधून काढले व त्या पत्यावरील घर पण शोधून काढले. ते घर म्हणजे एक चंद्रमौळी झोपडी होती. झोपडीचे दार बंद होते. त्याने दाराची कडी वाजवली. एका जख्ख म्हातारीने दार उघडले. त्या म्हातारीचे सर्वांग लटपटत होते. काठीचा आधार घेऊन ती कशीबशी उभी होती. शरीर खंगलेले, चेहेरा सुरकुतलेला, गालाची हाडे वर आलेली, अंगावर फाटके कपडे पण चेहेर्‍यावर स्वाभीमान असे तिचे रूप होते.

‘आजी मला तुमची 50 रुपयांची नोट सापडली! हे घ्या तुमचे पैसे!’ असे म्हणून त्याने खिशातील 50 रुपयांची नोट काढून आजींना दिली.

‘कमाल आहे! माझी हरवलेली 50 रुपयांची नोट देण्यासाठी आत्तापर्यंत 40 माणसे येऊन गेली. तु 41 वा आहेस!’ आजी म्हणाल्या.

‘तुला कोणी सांगीतले माझे पैसे हरवले आहेत म्हणून?’ आजींनी विचारले.

‘मी ते खांबावरच्या चिठ्टीमध्ये वाचले.’ त्या माणसाने उत्तर दिले.




‘एकतर माझे पैसे मुळीच हरवेले नाहीत! दुसरे म्हणजे ती खांबावरची चिठ्ठी मी लिहीलेली नाही. कारण एकतर मला नीट दिसत नाही त्यामूळे मी घरातून बाहेर पडत नाही. तसेच मला लिहीता वाचता पण येत नाही. कोणीतरी खोडसाळपणाने ती चिठ्टी लिहीली आहे. हे तुझे 50 रुपये परत घेऊन जा!’ आजी म्हणाल्या.

‘नको आजी! राहुदे हे पैसे तुमच्याजवळ! तुम्हालाच ते उपयोगी पडतील!’ तो माणूस म्हणाला.

‘कमाल आहे! आत्तापर्यंत जो जो माणूस माझे हरवलेले 50 रुपये परत द्यायला आला त्याला मी पैसे परत घे म्हणून सांगीतले तर प्रत्येकाने हेच उत्तर दिले!’ आजीबाई म्हणाल्या

‘माझे एक काम करशील?’ आजीबाईंनी विचारले.

‘हो सांगाना! तुमचे काम नक्की करीन!’ त्या माणसाने उत्तर दिले.

‘अरे बाबा! जाताना ती खांबावरची चिठ्ठी फाडून टाक. लोकांना उगीच त्रास होतो आणि भुर्दंड बसतो. मी सगळ्यांनाच ती चिठ्ठी फाडून टाकायला सांगीतली. पण अजून कोणी ते काम केलेले दिसत नाही. बहुतकरून विसरले असावेत. निदान तू तरी ते काम करून टाक’ असे म्हणून त्याला धन्यवाद देत त्या आजींनी त्यांच्या झोपडीचे दार बंद केले.

परत जाताना त्या माणसाला त्या खांबावरची चिठ्ठी दिसली. ती चिठ्ठी फाडण्यासाठी म्हणुन तो त्या खांबाजवळ आला आणि थबकला.

त्याच्या लक्षात आले की त्या एका चिठ्ठीमूळे माणुसकीचा झरा वाहू लागला आहे. त्या चिठ्ठीमूळे अनेक लोकांची मदत त्या गरीब आजीबाईंना मिळाली आहे. आपले 50 रुपये गेले पण एका गरजू माणसाला मदत केल्याचा आनंद व समाधान आपल्याला मिळाले. असेच समाधान त्या 40 लोकांना पण मिळाले असेल. ही चिठ्ठी जर आपण फाडून टाकली तर माणुसकीचा झरा आटून जाईल. त्याला ती चिठ्ठी लिहिणार्‍या माणसाचे कौतूक वाटले आणि तो चिठ्ठी न फाडताच तेथुन निघुन गेला.

‘माणुसकी नाही! माणुसकी नाही!’ अशी हाकाटी आपण मारत असतो. ‘हल्ली माणुसकी शिल्लक राहीली नाही! माणसाला माणसाची पर्वा किंवा किंमत राहिली नाही’ अशी बोंब ठोकत आपण सगळीकडे फिरत असतो. पण समाजात माणुसकीचे असे ‘सुप्त’ झरे नेहमीच वाहत असतात. फक्त आपल्याला ते दिसत नसतात. माणुसकीचे हे झरेच समाजाला व माणसाला जिवंत ठेवत असतात. असे झरे हेच समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण असते.




तुम्हाला सुद्धा माणुसकीच्या अशा एखाद्या झर्‍यामध्ये सामील होण्याची संधी मिळाली तर ती जरूर घ्या. इतरांना मदत केल्यामुळे जो काही आनंद किंवा समाधान मिळते याचा जरूर अनुभव घ्या!

अर्थात हा अनुभव घ्यायचा की नाही हे तुम्हीच ठरवायचे!


TEAM meaning Together Everyone Achieves More

टीम (TEAM) म्हणजे नक्की काय ?



▪एकदा एक श्रीमंत उद्योगपती एका खेडेगावात कारखान्यासाठी साईट बघायला गेला होता ...

▪रस्ता कच्चा, खडबडीत होता. काही ठिकाणी रस्त्यात पाणी पण साठले होते, खुप चिखल झाला होता. येताना त्या उद्योगपतीची गाडी चिखलात रुतली आणि बंद पडली ...

▪कोणाची मदत मिळते का हे बघायला तो गाडितून खाली उतरला. त्याला थोड्या अंतरावरू एक म्हातारे शेतकरीबाबा येताना दिसले. त्याने त्या शेतकरीबाबांना थांबले, गाडी चिखलात रुतल्याचे सांगीतले व मदत करण्याची विनंती केली ...

▪शेतकरी बाबा गाडीजवळ आले, पहाणी केली आणि म्हणाले, ‘ नामदेवला, म्हणजे नाम्याला बोलवायला लागेल ...!’

▪‘मग बोलवाना तुमच्या त्या नाम्याला! मी त्याला चांगले बक्षीस देईन! मस्त जेवायला, खायला घालेन ...!’ तो उद्योगपती म्हणाला ...

▪आहो नाम्या म्हणजे कोणी माणुस नाही. तो येक बैल आहे. मी आत्ता त्याला घेऊन येतो!’ ते शेतकरी म्हातारबाबा म्हणाले व लगेचच ‘नाम्याला’ म्हणजे त्या बैलाला घेऊन आले ...

▪त्या बैलाला दोरीच्या सहाय्याने गाडीला जुंपले आणि म्हणाले ...
‘हे हरबा खेच! हे ढवळ्या खेच! हे नाम्या खेच! हे पवळ्या खेच!’

▪त्याबरोबर त्या बैलाने जोर लाऊन ती गाडी चिखलातून खेचून बाहेर काढली. हे बधून तो उद्योगपती खुष झाला पण त्याला समजेना की गाडीला एकच बैल जुंपलेला असताना त्या म्हातारबाबांनी चार बैलांची नावे का घेतली ...

▪उद्योगपतीने त्याचे कारण विचारले तेव्हा ते म्हातारबुवा उत्तरले ...
‘ त्याचे काय आहे! आमचा नाम्या आहे म्हातारा आणि आंधळा. त्याला दिसत नाही. त्यामुळे त्याला एकट्यालाच गाडीला जुंपले आहे हे त्याला माहीत नाही. मी अजून तीन बैलांची नावे घेतली कारण नाम्याला वाटावे की त्याच्याबरोबर अजून तीन बैल आहेत. म्हणजे तो टिममध्ये काम करतो आहे. म्हणूनच तो त्याची ताकद पणाला लाऊन सर्वोत्तम काम करून दाखवतो. साहेब तुमच्या भाषेत याला ‘टीम स्पिरीट’ म्हणतात नाही का?’



▪एका पागोटे, मुंडासेवाल्या म्हातार्‍या शेतकरीबुवांचे हे बोलणे ऐकून तो उद्योगपती चाटच पडला ...

▪या कथेतील मतितार्थ ....


कोणतेही काम हे टिम/संघटन केल्याशिवाय होणे अशक्य जरी असले तरी त्या टिम मधिल सर्व घटकांनी कोणाचीही वाट न पाहता जर जीव ओतून व जोर लावून काम केल्यास ते कार्य अव्दितीय व चोक झाल्याशिवाय राहत नाही ...

आपल्या बरोबर कोणी असू नाही तर नसू आपल्यावर असणारी जबाबदारी आपण अगदी चोकपणे करु शकतो हा विश्वासच आपल्याला मनोबल देवून कार्य करुन घेण्यास सहाय्य करत असतो ...

आपण स्वत: म्हणजेच एक टिम आहे असे समजून व प्रत्येक सहकार्‍या बरोबर स्वत: पुढे होऊन कार्य केल्यास बरोबर असणारांचाही आत्मविश्वास वाढत असतो ...


टिम किंवा संघटणात्मक काम करत असताना मी बरोबर आहे तुम्ही हे करा, तुम्ही ते करा असे सांगून बघत बसणारे त्या टिमसाठी घातक मेंबर ठरतात ...

मी हे करु शकतो आणि मीच करणार, फक्त माला या कामात थोडी मदत करा असे म्हणून कार्य करणारे ग्रेट असतात ...

         TEAM या शब्दाचा अर्थ ....
                   T = Together ....
                    E = Everyone ...
                    A = Achieves ...
                     M = More ...

भुकेलेले राहा.. वेडे राहा

प्रेरणादायी स्टीव्ह जॉब्सचा  शेवटचा  संदेश होता






स्टीव्ह जॉब्सने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात केलेले भाषण प्रचंड गाजले. हे भाषण म्हणजे त्यांच्या प्रेरणादायी आयुष्याचा गोषवारा आहे… श्री. अमोल कडू याने त्याचा केलेला मराठी अनुवाद…

जगातल्या सर्वोत्तम गणल्या जाणा-या महाविद्यालयांपैकी एक अशा महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात तुमच्यासोबत बोलायची संधी मला मिळते आहे, हा मी माझा बहुमान समजतो. मी महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण करू शकलो नाही. आता सत्य सांगायला हरकत नाही, पण महाविद्यालयीन दीक्षांत समारंभ इतक्या जवळून मी पहिल्यांदा पाहतो आहे.

आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील तीन गोष्टी सांगणार आहे. बस्स.. काही प्रचंड कहाणी नाही.

 फक्त तीन छोटय़ा गोष्टी..


पहिली गोष्ट आहे ठिपके जुळवण्याच्या संदर्भातली…

 मी रीड कॉलेजमधून सहा महिन्यांतच बाहेर पडलो होतो, पण त्या आधी मी जवळपास १८ महिने कॉलेजमध्येच ड्रॉप इन म्हणून घुटमळत होतो. मग मी बाहेर पडलो तरी का?


याची सुरुवात खरं तर माझ्या जन्माच्या आधीपासूनची आहे. माझी आई ही एक तरुण, अविवाहित महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती, आणि तिने मला दत्तक द्यायचे ठरवले. तिची फार इच्छा की मी पदवीधर पालकांकडे दत्तक म्हणून जावे, त्यामुळे अखेर एका वकील दाम्पत्याची त्याकरिता निवड झाली. सारे कसे सुरळीत चालू होते आणि अचानक माझ्या जन्माच्या वेळी त्या दोघांनी ठरवले की त्यांना मुलगी हवी आहे.. त्यामुळे वेटिंग लिस्टवर असलेल्या माझ्या आई-बाबांना रात्री अचानक फोन गेला की, ‘‘मुलगा झालाय.. तुमची अजूनही त्याला स्वीकारण्याची तयारी आहे का?’’ ते म्हणाले, ‘‘अर्थातच..’’ अर्थात, नंतर माझ्या आईला कळले की माझ्या दत्तक आईने पदवी पूर्ण केली नव्हती आणि वडिलांनी तर शाळेच्या पुढेही मजल मारली नव्हती. तिने मग दत्तक कागदपत्रे साईन करायला नकार दिला. मग मला ‘महाविद्यालयीन शिक्षणापासून दूर ठेवले जाणार नाही’ या आश्वासनावरच तिने कागदांवर सह्या केल्या.

१७ वर्षांनंतर मी खरंच कॉलेजला गेलो. मूर्खासारखे मी स्टॅन्फोर्डसारखे महागडे कॉलेज निवडले आणि माझ्या दत्तक पालकांची मध्यमवर्गीय कमाई माझ्या शिक्षणावरच खर्च होऊ लागली. सहा महिन्यांतच त्याची किंमत मला उमगेनाशी झाली. मला माझ्या अयुष्यात मला काय करायचे आहे याची सुतराम कल्पना नव्हती आणि कॉलेजचे शिक्षण मला याचे उत्तर शोधण्यात मदत करत नव्हते आणि मी इथे आईबाबांची आयुष्यभराची कमाई उडवण्यात गुंतलो होतो. म्हणून मी कॉलेजमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि सुस्कारा सोडला.. अर्थात, त्या वेळी हा छातीत धडकी भरवणारा निर्णय होता.. पण आता वाटते की कदाचित हा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला निर्णय असेल.. हा निर्णय पक्का झाल्याक्षणीच मी ज्या वर्गाबाबतीत उत्साही नव्हतो तिथे जाणे बंद करून टाकले आणि ज्या वर्गामध्ये मला जाण्यात रस होता त्या वर्गाना नियमितपणे जाऊ लागलो.

हे सगळेच काही स्वप्नवत नव्हते.. डोर्म मिळायची नाही, म्हणून मित्रांच्या रूम्सवर जमिनीवर झोपावे लागे.. कोकच्या रिकाम्या बाटल्या देऊन मी ५ सेंट्स जमा करत असे.. आणि त्यातून जेवणाची तजवीज करत असे.. दर रविवारी ७ मैल चालत जात असे, ‘हरे राम हरे कृष्ण’चे व्यवस्थित जेवण खायला मिळावे म्हणून.. पण मला ते आवडत होते.. माझी अंत:प्रेरणा आणि माझे कुतूहल यांनी मला जे काही सापडले, ते पुढे आयुष्यात अनमोल ठरले. आता हेच पाहा ना…रीड कॉलेजमध्ये त्यावेळेला बहुधा सर्वोत्तम असे कॅलिग्राफीचे (सुलेखन) वर्ग चालत. संपूर्ण परिसरात प्रत्येक भित्तीपत्रकावर, इतकेच काय अगदी खणांवरदेखील सुंदर कॅलिग्राफी केलेली आढळे. मी तसाही ड्रॉप आऊट होतो आणि मला हे कसे करतात हे जाणून घ्यायचे होते, त्यातच मला माझे नियमित वर्ग करणे जरूरीचे राहिले नव्हते. कॅलिग्राफीच्या वर्गात मी सेरिफ आणि सान्स सेरिफ फॉण्ट्सविषयी मी शिकलो. त्याच्याच बरोबर दोन अक्षरांमध्ये किती जागा असावी, अक्षरे सुशोभित कशी करावी याचेही ज्ञान मिळत होते. ते सारेच फार सुंदर, ऐतिहासिक आणि कलात्मकरीत्या हळुवार होते.. कदाचित शास्त्राच्या चिमटीत पकडण्यापलीकडले… मी त्याने भारावून गेलो…

या सगळ्याचा माझ्या आयुष्यात दुरान्वयानेही मला काही प्रत्यक्ष लाभ होईल असं मला स्वप्नातही वाटलं नसतं. पण दहा वर्षांनंतर जेव्हा आम्ही पहिला मॅकिन्टोश कम्प्युटर बनवत होतो, हा सगळा काळ माझ्या मदतीला आला. आम्ही त्या सगळ्याचा वापर मॅकिन्टोशमध्ये केला. सुंदर टायपोग्राफी असलेला तो पहिला कम्युटर होता. जर मी महाविद्यालयातून त्या विषयांच्या जंजाळातून बाहेर पडलो नसतो, तर मॅकिन्टोशमध्ये विविध टाईप फेसेस आणि प्रमाणबद्ध फोण्टस दिसले नसते आणि विंडोज्वाल्यांनी जर मॅकिन्टोश जसाच्या तसा कॉपी केला नसता, तर आज जगातल्या कुठल्याच पीसीवर ते दिसले नसते. मी महाविद्यालयातून बाहेर पडलो नसतो तर या कॅलिग्राफीच्या वर्गात कसा पोहोचलो असतो; आणि अर्थात, आज पीसीवर जे सुंदर टाइप फॉण्ट्स दिसतात ते कसे दिसले असते.. अर्थात हे ठिपके जोडणे.. आज १० वर्षांनंतर मागे वळून बघताना सोप्पे जाते.. तेव्हा हे कळत नव्हते..

पुन्हा.. हे ठिपके तुम्ही भविष्यात बघून नाही जोडू शकत.. ते फक्त मागे वळून बघताना जोडलेले दिसतात. म्हणूनच ते पुढे जाऊन जोडले जातील, यावर विश्वास ठेवावा लागतो. तुम्हाला कशावर तरी विश्वास ठेवावाच लागतो.. तुमचे मन, आतला आवाज, भाग्य, नशीब, कर्म.. काहीतरी.. या विचार पद्धतीने मला कधीच दगा दिलेला नाही आणि त्यामुळेच माझ्या आयुष्यात बराच बदल घडलेला आहे.

माझी दुसरी गोष्ट आहे प्रेम आणि तोटय़ाविषयी..


मी फार नशीबवान आहे. मला काय करायला आवडते हे मला फार आधीच उमगले होते. मी २० वर्षांचा असतानाच मी आणि वोझने मिळून घरच्या गॅरेजमध्ये अॅपल कम्प्युटर्सची सुरुवात केली. आम्ही खूप मेहनत केली. दहा वर्षांत गॅरेजमधल्या आम्हा दोघांपासून सुरू झालेली अॅपल २ बिलियन डॉलर्स आणि ४००० कामगारांची कंपनी झाली होती. आम्ही वर्षभरापूर्वीच आमचे सर्वोत्तम काम बाजारात आणले होते.. मॅकिन्टोश कम्प्युटर! मी तेव्हा फक्त ३० वर्षांचा होतो. आणि अचानक मी माझ्या कंपनीतून हाकलला गेलो. तुम्ही स्वत: स्थापन केलेल्या कंपनीतून तुम्ही स्वत: हाकलले कसे जाऊ शकता? खरं सांगायचं झालं तर जसं अॅपल वाढत होतं, त्याच्याबरोबर मला गुणी वाटणा-या काही मंडळींना मी नोकरीवर ठेवले. काही वर्षे ठीक गेली, पण नंतर आमच्या दृष्टिकोनात फरक पडू लागले. अखेर भांडणे झालीच.. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी पण त्यांचीच पाठराखण केली. साहिजकच वयाच्या तिसाव्या वर्षी मी अक्षरश: हाकलला गेलो.. आणि तेही अतिशय सार्वजनिक पद्धतीने.. माझ्या आयुष्याचा जो केंद्रबिंदू होता, तोच गायब झाला. मी उद्ध्वस्त झालो..

काही महिने.. नक्की काय करावे हेच सुचेना.. मला जणू माझ्या आधीच्या कार्यकुशल उद्योजकांचा विश्वासघात केल्यासारखे वाटत राही.. जणू आधी धावणा-याने माझ्या हातात दिलेले निशाण मी पाडून बसलो होतो. मी डेव्हिड पेकार्ड, बोब नोईस यांना भेटलो.. आणि अशा पद्धतीने घोळ घातल्याबद्दल त्यांची माफी मागितली. मी एक मोठे सार्वजनिक अपयश बनलो होतो आणि सिलिकॉन व्हॅलीतून पळून जाण्याचे विचार मनात घोळू लागले होते. पण हळूहळू एक गोष्ट जाणवायला लागली.. माझे अजूूनही माझ्या कामावर प्रेम होते.. अॅपलमधल्या घटनांनी त्यात तीळभरही फरक पडला नव्हता. मला नाकारण्यात आले होते.. पण माझे प्रेम संपले नव्हते.. म्हणूनच.. मी पुन्हा सुरुवात करण्याचा निश्चय केला.

तेव्हा तसे वाटले नसेल कदाचित, पण अॅपलमधून हाकलले जाणे ही माझ्या आयुष्यातली सर्वाधिक चांगली घटना ठरली. यशस्वी असण्याचे सगळे दडपण गळून पडले. त्याची जागा एखाद्या नवोदिताच्या खांद्यावर असलेल्या हलकेपणाने घेतली. कशाचीही खात्री नव्हती.. याच स्थितीमुळे मी माझ्या आयुष्यातल्या सर्वाधिक सृजनात्मक कालखंडात प्रवेश केला..


त्यानंतरच्या ५ वर्षांत मी ‘नेक्स्ट’ नावाची कंपनी स्थापन केली, ‘पिक्सार’ नावाची दुसरी कंपनीही उभारली आणि एका अशा भन्नाट स्त्रीच्या मी प्रेमात पडलो जिच्याशी मी लग्न केले. ‘पिक्सार’ने जगातली पहिली अॅनिमेटेड फिल्म ‘टॉय स्टोरी’ बनवली आणि आज ती जगातली पहिल्या क्रमांकाची अॅनिमेशन कंपनी आहे.. गंमत म्हणजे, पुढे ‘नेक्स्ट’पण ‘अॅपल’ने विकत घेतली.. आणि आम्ही ‘नेक्स्ट’मध्ये बनवलेले तंत्रज्ञान आज ‘अॅपल’च्या कामाला येते आहे.. आणि ‘अॅपल’च्या यशाला ते कारणीभूत ठरते आहे..

मला खात्री आहे की मी जर ‘अॅपल’मधून हाकलला गेलो नसतो तर हे कधीच घडले नसते. औषधाची चव घेणे कठीण असते, पण रुग्णाला त्याचीच गरज असते. कधी आयुष्याने डोक्यात दगड घातलाच, तर निराश होऊ नका. मला खात्री आहे की जर माझे माझ्या कामावर प्रेम नसते तर मी अशा पद्धतीने काम करत राहू शकलो नसतो. आपले प्रेम कशावर आहे याचा शोध घेत राहा. हे केवळ तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते तुमच्या कार्यक्षेत्रातही. तुमच्या आयुष्यातला एक मोठा भाग तुम्ही काम करण्यात व्यतीत करणार आहात, आणि उत्तम काम करण्याकरिता तुम्ही जे करताय त्यावर तुमचे प्रेम असणे आवश्यक आहे. जर ते तुम्हाला अजून सापडले नसेल तर मग शोधात राहा.. स्वत:ची समजूत घालून नका घेऊ. हृदयाच्या इतर गोष्टीप्रमाणेच जेव्हा तुम्हाला ते सापडेल, तेव्हा ते तुम्हाला आपोआप जाणवेल आणि एखाद्या सुंदर नात्याप्रमाणे वर्षे जशी सरकत जातील, तसतसा तुमचा त्यातला रस वाढतच राहील. म्हणून म्हणतो.. शोधत राहा.. स्वत:ची समजूत घालून नका घेऊ.

माझी तिसरी गोष्ट मृत्यूविषयी आहे..


मी १७ वर्षांचा होतो तेव्हा एक वाक्य वाचले होते.. ‘जर तुम्ही रोज आपले आयुष्य आजचा दिवस शेवटचा असं समजून घालवलात तर कमीत कमी एक दिवस तुमची समजूत खरी ठरेल.’ या वाक्याने माझ्यावर खूप परिणाम केला होता. तेव्हापासून जवळपास ३३ वर्षे मी रोज सकाळी उठतो आणि आरशात पाहून स्वत:ला विचारतो- ‘‘जर आज मला मरण यायचे असेल, तर आज जे मी करतो आहे तेच मला करायला आवडेल का?’ जर माझे उत्तर बरेच दिवस ‘नाही’ असेल, तर मला कळते की काहीतरी बदल करायची गरज आहे.

मला लवकरात लवकर कधीही मृत्यू येऊ शकतो ही कल्पना मला माझ्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेताना खूप कामाला येते. कारण आपल्या बाह्य अपेक्षा, सारा अहंकार, लाज किंवा अपयशाची भीती हे सारं सारं मरणाच्या भीतीमध्ये नष्ट होतं.. आणि जे महत्त्वाचं आहे, तेवढंच उरतं. तुम्ही मरणार आहात हे लक्षात ठेवणे म्हणजे तुम्ही काहीतरी गमावू शकता या भीतीपासून मुक्ती असं मी समजतो. तुम्ही आधीच इतके नागवे झालेले असता की हृदयाचं सोडून दुस-या कुणाचं ऐकण्याचं तुम्हाला कारणच रहात नाही.

साधारण वर्षांपूर्वी मला कॅन्सर असल्याचे निदान झाले. सकाळी ७.३० वाजता माझा स्कॅन झाला आणि स्वादुपिंडापाशी मला भला मोठा टय़ुमर असल्याचे स्पष्ट झाले. मला स्वादुपिंड शरीरात कुठे असते हेही ठाऊक नव्हते. डॉक्टर म्हणाले हा जवळपास असाध्य अशा स्वरूपाचा कॅन्सर आहे आणि मी काही सहा महिन्यांपेक्षा जास्त जगणार नाही. डॉक्टरने मला घरी जाऊन सा-या गोष्टींची आवराआवर करायला सांगितले, म्हणजे दुस-या शब्दात तो मला मृत्यूसाठी तयार राहायला फर्मावत होता. याचाच दुसरा अर्थ म्हणजे पुढच्या दहा वर्षांत तुम्ही आपल्या मुलांना ज्या चार युक्तीच्या गोष्टी सांगणार होता, त्या सांगायला आता तुमच्याकडे फक्त सहा महिने आहेत. याचाच दुसरा अर्थ म्हणजे सगळी बटणं लावून तयार राहा.. निरोप घ्यायची वेळ आलेली आहे..
त्या निदानासोबत मी एक दिवस घालवला.. त्या दिवशी संध्याकाळी माझी बायोप्सी झाली. त्यांनी माझ्या घशावाटे आणि पोटातून आतडय़ात एन्डोस्कोप घुसवला, माझ्या स्वादुपिंडात सुई खुपसून त्यांनी तिथल्या पेशी काढल्या. मला अर्थात भूल दिली होती, पण माझी पत्नी म्हणाली की, जेव्हा डॉक्टर्सनी त्या पेशी सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्या, तेव्हा ते आनंदाने रडू लागले. माझा कॅन्सर अतिशय दुर्मिळ असला तरी शस्त्रक्रियेने तो बरा करता येण्यासारखा होता.. माझ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि मी आता ठणठणीत बरा आहे.

ही माझी मृत्यूशी झालेली सर्वात जवळची आणि बहुधा अजून दोन दशक तरी टिकेल अशी ओळख. आत्ता मी याविषयी एवढय़ा अधिकारवाणीने बोलतो आहे, त्याचं कारण या एका उपयुक्त कल्पनेचं या अशा ओळखीत झालेलं रूपांतर.

मरण कुणालाच नको असतं. अगदी ज्यांना स्वर्ग हवा असतो त्यांचीही त्याकरिता मरण्याची तयारी नसते. तरीही मरण हे आपल्या सगळ्यांना एकत्र करणारच आहे. कोणालाही ते चुकलेले नाही. आणि हे खरंच अगदी बरोबर आहे, कारण मरण हा जीवनाचा सर्वात छान शोध आहे. तो जीवनातल्या बदलाचा शिल्पकार आहे. तोच जुन्याला दूर करून नव्याची वाट मोकळी करतो. आज, कदाचित तुम्ही चर्चेत आहात, पण उद्या तुम्ही हळूहळू म्हातारे व्हाल आणि दूर सारले जाल. जास्त नाटय़मय वाटले, तरी हेच सत्य आहे..

तुमच्याकडे अगदी मर्यादित वेळ आहे, म्हणूनच दुस-या कोणाचं आयुष्य जगत तो फुकट घालवू नका. दुसऱ्यांच्या विचारावर आधारलेल्या निष्कर्षांंचं जोखड आपल्या आयुष्यावर मिरवू नका. दुसऱ्यांच्या मतांच्या गलबल्यात आपला आतला आवाज दबून जाऊ नये याची काळजी घ्या. आणि सर्वात महत्त्वाचे, आपले हृदय आणि अंत:प्रेरणा यांचं ऐकायचं धाडस सदैव दाखवा. त्यांना जवळपास नेहमीच तुम्हाला काय बनायचे आहे, याची कल्पना असते. बाकी सगळे दुय्यम आहे.


जेव्हा मी तरुण होतो त्या वेळी होल अर्थ कॅटलॉग नावाचे मासिक प्रसिद्ध होत असे- जणू आमच्या पिढीचे बायबलच.. इथून जवळच मेन्लो पार्क इथे राहणारा स्टेवर्ट ब्रांड नावाचा इसम ते काढत असे आणि त्याने आपल्या कवीप्रवृत्तीने ते मासिक सजवले होते. ही गोष्ट १९६० ची, पर्सनल कम्प्युटर किंवा डेस्कटॉप पब्लिशिंगच्या खूप आधीची. साहजिकच, हे मासिक पूर्णपणे टाईपरायटर, कात्री आणि पॉलोराईड कॅम-याने बनवले जाई..जणू पेपरबॅक फॉर्ममधले गुगल.. आणि तेही गुगल येण्याच्या ३५ वर्षे आधी. खूप आदर्शवादी, नेटके आणि नव्या कल्पनांनी भारलेले.

स्टेवर्ट आणि त्याचे सहकारी भरपूर वर्षे त्या मासिकाचे अंक काढत राहिले.. आणि जेव्हा त्याचा प्रवास संपला तेव्हा त्यांनी त्याचा शेवटचा अंक काढला. सत्तरीची मध्यान्ह चालू होती आणि मी तुमच्याच वयाचा होतो.. त्या शेवटच्या अंकात शेवटच्या पृष्ठावर एक गर्द रानातल्या रस्त्याचे चित्र होते. त्याच्या खाली लिहिले होते.
‘भुकेलेले राहा… वेडे राहा…’

हा त्यांचा शेवटचा संदेश होता.. भुकेलेले राहा.. वेडे राहा.. मी सतत स्वत:साठी तेच मागतो. आणि आत्ता जेव्हा तुम्ही पदवीधर होऊन बाहेर पडताय.. तेव्हा तुमच्यासाठी पण हीच इच्छा करतो आहे..
भुकेलेले राहा.. वेडे राहा!!!



source of article 

http://maharashtramajha.com/technology/steve-jobs-2005-stanford-commencement-address/

स्वत:ची किंमत ठरावा

उगाच काळजी करत रहाणं म्हणजे पाउस येइल या भीतीने छत्री उघडी करुण चालण्यासारख आहे . 




एकदा एक मानसशास्त्रज्ञ ताण तणाव कसा हाताळायचा या विषयावर बोलण्यासाठी वर्गात आला . 

त्याने हात उंचावून पाण्याचे ग्लास सर्वाना दाखवले , "ग्लास अर्धा भरलेला आहे कि रिकामी" हाच प्रश्न विचारला जाणार असे प्रत्येकाला वाटले पण त्याने विचारले "या ग्लासाचे वजन किती असेल ?" .



 २० ग्राम , ८० ग्राम , ५० ग्राम अशी उत्तर देण्यात आली . 
मानसशास्त्रज्ञ म्हणाला " याच वजन किती आहे हे महत्वाचं नाही आहे ? ते आपण किती वेळ धरून ठेवतो ते महत्त्वाचे आहे , जर मी ग्लास काही मिनिट धरून ठेवलं तर मला काही फरक पडणार नाही पण जर मी हे ग्लास तासभर धरलं तर माझा हात दुखू लागेल , दिवसभर धरला तर मला थकवा जाणवू लागेल माझ्या हात सुन्न होऊ लागेल पण या सर्व स्थितीत ग्लासच वजन तेवढाच असेल पण जितका जास्त वेळ मी उचलून धारण तेवढेच मला ते जास्त वजनदार वाटू लागेल " तो पुढे म्हणाला " 

आयुष्यातील काळजी , चिंता पण अशाच पाण्याच्या ग्लासा सारख्या आहेत तुम्ही त्यांचा काही क्षणासाठी विचार केला तर काही होणार नाही पण जर तुम्ही जितका जास्त वेळ त्याचा विचार करत राहाल तेवढाच जास्त त्रास ताण वाढेल तुम्ही सर्व गमवून बसलात असे वाटेल तेव्हा जितक्या लवकर त्या पासून मुक्त व्हा त्यांना सकाळ दुपार रात्री पर्यंत बाळगू नका " ग्लास लवकरात लवकर खाली ठेवण्याचा प्रयत्न करा "

आयुष्य म्हणजे काय धरून ठेवायचे व का्य सोडून द्यायचे याचे तोल संभालने आहे 


एका कार्यक्रमात एका व्याख्यात्याने १००० रुपयाची नोट सर्वांसमोर धरली आणि म्हणाला हि नोट कुणाला हवी त्यांनी हात वर करा जमलेल्या सर्व लोकांनी हात वर केले मग त्याने नि थोडी चुरगळली पुन्हा सर्वाना विचारलं हि नोट कोणाला हवी ,परत सर्वानी हात वर केले आता व्याख्यात्याने ती नोट खाली फेकली नोट थोडी मळली होती तेव्हा पुन्हा त्याने विचारले हि नोट कोणाला हवी परत सर्वानी हात वर केले . आता व्याख्याता म्हणाला ज्या प्रमाणे प्रत्येक वेळी नोट चुरगाळून खाली पडूनही तुम्ही नोट मिळवण्यासाठी हात वर करत होतात कारण नोटेची 
किंमत कमी होत नाही त्या प्रमाणेच तुम्ही स्वतः कडे पहा 

कितीही संकट आली संघर्ष करावे लागले तरी तुमची किंमत कमी होत नाही.


यश म्हणजे पराभवानंतर आपन किती जोमानं लढन्यास  तयार होतो हे आहे .

Labels

Find Us On Facebook

Latest Post

मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत

 दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती        इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्...