Marathi Popular joke, मराठी पॉप्युलर जोक , मराठी प्रसिद्ध जोक , मराठी चुटकुले , फनी मराठी जोक , funny Marathi joke
मास्तर : इंडिया गेट काय आहे?
मुलगा : बासमती तांदूळ.
मा : चारमिनार?
मु : सिगरेट.
मा : ताजमहाल?
मु : चहा.
मा : गाढवा! देशातील इतकी प्रख्यात स्थळं तुला माहिती नाहीत. जा, तुला नापास केलं. उद्या येताना वडिलांची सिग्नेचर आण.
दुसऱ्या दिवशी पोरगं चकचकीत कागदात गुंडाळलेलं पुडकं आणून टेबलावर ठेवतं.
मास्तर : हे रे काय?
पोरगं : बाबांची सिग्नेचर. आख्खी बाटली आणली.
मास्तर गहिवरून आले. पोराला छातीशी धरून म्हणाले, "अरे वेडा कुठला. कोण म्हणतं तू नापास झाला? तुला शंभर पैकी शंभर!"