बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा , अपने मोबाइल से ऑटो sms भेजकर मार्केटिंग करे विजिट करे http://autotextsms.com/ बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा http://autotextsms.com/

आयुष्याचा शेवट

गावाच्या वस्ती मधील स्मशानभूमीत प्रेत एकटेच जळत होते
ते पाहून असंख्य प्रश्नांनी हर्षलच्या मनात एकच गदारोळ उत्पन्न केला होता.




      हेच ते प्रेत जीवंत असताना
माझे -माझे करत असेल, एक एक रुपया साठी झगडत असेल,
मोह -माया- काम- क्रोध- मत्सर यांना घेऊन समाजात जगत असेल, आरे ला कारे करणारा देह ,आज मात्र जळतोय शांत, स्तब्ध, एकाकी
तरीही  शांतपणे पडून स्वतःला जाळून घेतोय
जीवलगांनी त्यांच्यासाठी जीव  लावला. ते आज ओक्साबोक्षी रडले. घरा पासुन स्मशानभुमी पर्यंतच सोबती झाले-खरे;परंतु विधि संपताच त्यांनी घराचा रस्ता धरला.घरी जाऊन त्यांनी सुद्धा कडू घास काढण्यासाठी दोन चार घास पोटात घातले असतील, आज दोन चारघास पण उद्या पासुन पोटभर अन्न खातील ते.
जमवलेल्या लाखो रूपयाच्या संपत्ती पैकी फुटका रूपया मुखात आलाय, जीवनात 100 एकर जमीनीच्या तुकड्याला खरेदी केले, तरीही जाळायला नेले स्मशान भुमीतील एकाकी घाटावर,
अलिशान बंगल्यामध्ये छानसा सुंदर तयार केलेला बाथरूम, तरीही शेवटची अंघोळ ही त्यात नव्हती, तर ती होती फक्त आणि फक्त घरा समोरील रस्त्यावर
आयुष्यभर ज्या साठी झगडला, त्यातील एक गोष्ट सुध्दा  बरोबर नव्हती.
जळतांना - ना प्रेम करणारे जीवलग, ना नातेवाईक, ना सगे सोयरे,ना करोडोची संपत्ती अरे अरे.
तरीही तो आयुष्यभर खोट्या गोष्टीचा मोह धरून पळत राहिला. ही खंत तर नसेल वाटत त्या जळणा-या  प्रेताला
     समाज बंधुंनो  !

.



आत्मप्रौढी, स्वत:चा मोठेपणा, दुस-याबाबत आकस, समोरच्याला कमी लेखनाची हीन मनोवृत्ती, गर्वाची भाषा, अहंपणाचा महामेरू ही जीवनातील -हासाची कारणे सोबत असतील तर जीवन कदापी सुंदर होणार नाही*
     चला, जीवन सुंदर बनविण्यासाठी काम-क्रोध-लोभ-मत्सररूपी लक्षणांना दुर ठेऊन जीवनात किती ही मोठेपद, प्रतिष्ठा, यश मिळाले तरी अहंकार रूपी सैतनानाला दुर ठेऊ या.
विचार जोडु या, समाज जोडु या,  समाजात खरे प्रबोधन घडऊ या

Labels

Find Us On Facebook

Latest Post

मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत

 दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती        इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्...