बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा , अपने मोबाइल से ऑटो sms भेजकर मार्केटिंग करे विजिट करे http://autotextsms.com/ बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा http://autotextsms.com/
Showing posts with label Inspirational Marathi Quotes. Show all posts
Showing posts with label Inspirational Marathi Quotes. Show all posts

Inspirational Marathi SMS

Inspirational Marathi SMS ,Inspirational Marathi  Quotes 



गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.
✿✿✿

रस्ता सुंदर आसेल तर नक्की विचारा तो कोठे जातो, 
पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे 
हे बघू नका त्या रयस्त्यावर चालत रहा.

✿✿✿

डोक शांत असेल तर निर्नय चुकत नाहीत 
अन भाषा गोड असेल तर मानस तुटत नाहीत. 

✿✿✿

एक माणूस २०ते२५ लोकांना दोन हाताने मारू शकत नाही 
पन तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो

✿✿✿

जेंव्हा सगळंच संपून गेलंय 
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते 
नवीन काहीतरी 
सुरु होण्याची..! 

✿✿✿


तुमचा आजचा संघर्ष 
तुमचे उद्याचे सामर्थ्य 
निर्माण करतो 
त्यामुळे 
विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !

✿✿✿

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, 
महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.

✿✿✿

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.

✿✿✿

प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,आणितो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार ?

✿✿✿

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !

✿✿✿


✿✿✿

यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.

✿✿✿

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं

आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!!

✿✿✿

आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका. सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

✿✿✿


यश

यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

नातं आणि विश्वास

नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप
चांगले मित्र आहेत.……
नातं ठेवा अगर ठेवू नका, विश्वास मात्र
जरुर ठेवा.
कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं
आपोआप बनत जात....
✿✿✿
कष्ट करा पोटभर मिळेल

कष्ट करा पोटभर मिळेल
विश्वास करा प्रेम मिळेल
सेवा करा सुख मिळेल
मदत करा फळ मिळेल
कल्पना करा मार्ग मिळेल
दोस्ती करा साथ मिळेल
दान करा धन मिळेल
आदर करा सन्मान मिळेल
सत्कार करा संस्कार मिळेल. 
जिवनांत चांगल्या माणसांना शोधू नका,स्वतः चांगले व्हा,कोणीतरी तुम्हाला नक्की शोधत येईल.....
✿✿✿
यश आणि सुख

यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे.

उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश.

यश आणि सुख जोडीने येतात.

आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश

आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.

✿✿✿
जीवनाचं सार्थक होईल ...

 मैत्री अशी करा की  जग आपलं होईल
अपयश असं स्वीकारा की विजेता भारावेल 
माणूस असे बना की माणूसकी नतमस्तक होईल
शिष्य असे बना की जगाला शिकवता येईल 
प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल 
प्रगती अशी करा की
भगवंत आणि कुटुंब आनंदी होईल 
आणि एकमेकांना सहकार्य इतकं करा की 
आपल्या जीवनाचं सार्थक होईल ...
✿✿✿
अश्रू कितीही प्रामाणिक असले तरी

अश्रू कितीही प्रामाणिक असले तरी, भूतकाळ परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते..
झाली चूक माफ करण्यात मोठेपना असतो,
सारख्या सारख्या चूका गिरवुन काढल्यास गोड संबंधात सुद्धा फाटे फुटतात.. म्हणुन चुका एकांतात सागांव्यात आणि कौतुक चारचौघात करावं नातं जास्त टिकतं...


✿✿✿
जी माणसं रागावतात

जी माणसं रागावतात ती नेहमी खरी असतात.
कारण खोटारड्यांना मी नेहमीच हसतांना पाहिले आहे.

खरं बोलून मन दुखावल तरी चालेल.
पण खोट बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका.
आयुष्यातील काही गोष्टी कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात.
तुम्ही  यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात. 

शुभ सकाळ
✿✿✿
जिंकायचे असेल तर

स्वतः ला जिंकायचे असेल तर डोक्याचा विचार करा....,,,
इतरांना जिंकायचे असेल तर ह्रदयाचा 
उपयोग करा...
✿✿✿
कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका

जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण,
उत्तम दिवस आठवणी देतात, 
चांगले दिवस आनंद देतात, 
वाईट दिवस अनुभव देतात, 
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात...

जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!
स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण....एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते...

आपला दिवस आनंदात जावो
✿✿✿
कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका

जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण,
उत्तम दिवस आठवणी देतात, 
चांगले दिवस आनंद देतात, 
वाईट दिवस अनुभव देतात, 
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात...

जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!
स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण....एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते...

आपला दिवस आनंदात जावो


✿✿✿
तू एवढा कसा रे थंड

पाण्याच्या माठाला विचारलं,
 तू एवढा कसा रे थंड असतोस…. ??

त्याने उत्तर दिल…. "ज्याचा भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही मातीच आहे त्याने थंडच असलेल बर ना"…. 

माणसाला हेच कळल तर किती बर होईल….     
✿✿✿
एकदा वेळ निघून गेली की

एकदा वेळ निघून गेली की सर्व
काही बिघडून जाते असे म्हणतात..
पण 
कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी 
सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो... 
✿✿✿
लहानपणी मी खुप श्रीमंत होतो

लहानपणी मी खुप श्रीमंत होतो 
कारण
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
या पावसाच्या वाहणाऱ्या..
पाण्यात माझी पण..
२,३ जहाज चालायचे ..

मोकळ्या हवेत. .
कागदाची का असेनात
स्वतःची विमाने उडवायचो..

भले चिखलाचा का असेना
पण स्वताचा .
किल्ला असायचा. ....

आता हरवली ती श्रीमंती 
आणि हरवले ते बालपण....
✿✿✿
आयुष्याची मजा

आपल्या आवडत्या व्यक्तीला वेळ देऊ शकला नाहीत 
तर दुरावा वाढतो, अंतर वाढते..
यात चूक त्याची पण नसते,
आणि तिची पण नसते,
चूक वेळेची असते.....
यावर एकाच उपाय आहे,
त्या व्यक्तीला जितके क्षण द्यालते असे द्या कि,
तुमच्या सोबतचे ते दोनच क्षणत्या व्यक्तीच्या एकांतातल्या 
शंभर क्षणावर भारी पडतील
जीवाला जीव देणारी माणसं खूपकमी असतातत्यांना असे गमवू नका...
आयुष्याची मजा एकटे जगण्यात नसते...

✿✿✿
गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना 
कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद 
मनमुरादपणे लुटता येत नाही.
✿✿✿
भरलेला खिसा

भरलेला खिसा माणसाला "दुनिया" दाखवतो ... 
अन रिकामा खिसा याच दुनियेतली "माणसं" दाखवतो..

ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही.

आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती...

✿✿✿
आयुष्य हे वहीतील पानांसारखंअसतं

आयुष्य हे वहीतील पानांसारखंअसतं..!
रिकामं तर रिकामं, 
लिहिलं तर छानअसतं...!
शेवटचं पान मृत्यू अन् पहिलं पान जन्मअसतं...!
मधली पाने आपणच भरायची,
कारण ते आपलंच कर्म असतं...!
होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं,कुठलंच
पान कधी गाळायच नसतं....!
चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं,
कारण त्यातूनच आपल्याला पुढेशिकायचं असतं.....!
✿✿✿
रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही

रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही 
ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा आपला प्रयत्न असतो.
तसेच, 
आपले जीवनही पुसले जाणार आहे 
हे माहीत असूनही आपण ते रांगोळीप्रमाणेच जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

माणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो..
प्रत्येक माणूस आप-आपल्यापरीनं निसर्गाची
'एकमेव अप्रतीम कलाकृती' असतो..

कधीही कोणाची कोणाशी तुलना करू नये..अगदी स्वतःचीही..!!
✿✿✿
खरा पराक्रम

भूतकाळासाठी रडण्यापेक्षा वर्तमानकाळाशी लढण्यात आणि भविष्याच्या शिखरावर चढण्यातच खरा पराक्रम आहे....

✿✿✿
माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात

माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात ,
काही फांदी सारखी,
जास्त जोर
दिला कि तुटणारी..

काही पानांसारखी, अर्ध्यावर साथ
सोडणारी, काही काट्यांसारखी सोबत असून टोचत
राहणारी..

आणि...

काही मुळांसारखी जी न
दिसता सुरुवाती पासून शेवट पर्यंत साथ
देणारी.....
✿✿✿


जीवनाच्या हिंदोळ्यावर

जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशजनक असतात. 
त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं....
जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते. 
तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं....

- अनामिक 
✿✿✿
जीवनामध्ये

जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका... 
1) विश्वास
2) वचन
3) नाते 
4) मैत्री 
5) प्रेम 
कारण
या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..
परंतु वेदना खुप होतात....
✿✿✿
एखाद्याला आपले महत्व पटवुन द्यायचे असेल तर

एखाद्याला आपले महत्व पटवुन द्यायचे असेल
तर त्याच्या पासुन थोडे दूर रहा,
आणि तुमची उणीव जाणवुन द्या....
पण
इतका वेळही दूर नको की 
ती व्यक्ति तुमच्याशिवाय जगायला शिकुन जाईल...
✿✿✿
भूक आहे तेवढे खाणे

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे
त्यापेक्षा जास्त खाणे
ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी
राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती....
✿✿✿
आई-वडिलांसाठी

आई-वडिलांसाठी 
कोणतीही गोष्ट सोडा....
पण,
कोणत्याही गोष्टीसाठी, 
आई-वडिलांना 
सोडू नका....
✿✿✿
सिंह बनुन जन्माला आले तरी

सिंह बनुन जन्माला आले तरी 
स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते
कारण ह्या जगात 
नुसत्या डरकाळीला महत्व नाही....
✿✿✿
जेव्हा नख वाढतात

जेव्हा नख वाढतात तेव्हा आपण त्यांना कापून टाकतो नख वाढली म्हणून बोटं कापून टाकत नाही....
त्याचप्रमाणे,
जेव्हा तुमच्यात गेरसमज होतात तेव्हा तुमच्यातला अहंकार कापा,
तुमच्यातल्या नात्याला कापू नका....
✿✿✿
मनातले सांगण्यासाठी

मनातले सारे काही सांगण्यासाठी,
समोर मनासारखा माणूस असावा लागतो,
एवढ असूनही चालत नाही,
त्या माणसालाही मन असावं लागतं....
✿✿✿
क्षण

कधी हसवतात ,
कधी रडवतात
क्षण हे आयुष्याच्या झाडावरुन,
पानांसारखे पडत असतात

✿✿✿
आनंदाने जगा

आयुष्य खुप कमी आहे, ते 
आनंदाने जगा.....
प्रेम् मधुर आहे, 
त्याची चव चाखा....
क्रोध घातक आहे, त्याला 
गाडुन टाका....
संकटे ही क्षणभंगुर आहेत, 
त्यांचा सामना करा....
आठवणी या चिरंतन आहेत, 
त्यांना ह्रदयात साठवून ठेवा....



रात्र नाही स्वप्न बदलते

रात्र नाही स्वप्न बदलते,
दिवा नाही वात बदलते,
मनात नेहमी जिँकण्याची
आशा असावी...
कारण....
नशीब बदलो ना बदलो,
पण 'वेळ' नक्कीच बदलते....

✿✿✿
मी घर विकत घेऊ शकतो...

मी घर विकत घेऊ शकतो...
पण त्या घराचे घरपण नाही...

मी घड्याळ विकत घेऊ शकतो...
पण गेलेली वेळ नाही...

मी मोठे पद विकत घेऊ शकतो...
पण आदर नाही...

मी मखमली गादी विकत घेऊ शकतो...
पण शांत झोप नाही...

मी पुस्तक विकत घेऊ शकतो...
पण विद्या नाही...

मी औषधे विकत घेऊ शकतो...
पण चांगले आरोग्य नाही...

मी रक्त विकत घेऊ शकतो...
पण कोमेजून जात असलेले जीवन नाही...

पैसा हेच सर्वस्व नाही...
✿✿✿
प्रतिष्ठा

तुमची प्रतिष्ठा तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल 
तर चारित्र्यवान माणसांच्या सहवासात रहा.
वाईट माणसांच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं श्रेयस्कर.

- जॉर्ज वॉशिंग्टन
✿✿✿
विचारांचा भक्कम पाया

ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही
त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. 
आणि यदाकदाचित समजा, 
ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच 
असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.
✿✿✿
आयुष्यात

आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो.. 
तर 
ती भावना जितकी दुर्दैवी आणि दु:खदायक असते.. 
त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं....
ही भावना जास्त भयंकर असते....

प्रयत्न करत रहा....
✿✿✿
Garv Aahe

Garv ahe shendur gulalacha
Garv ahe Bedhund Tutaricha
Garv ahe Chatrapati SHIVRAYANCHA,
Garv ahe Maharashtra chya Maticha
✿✿✿
वेळ आपल्यासाठी थांबत नाही

वेळ आपल्यासाठी थांबत नाही
मग योग्य वेळेची वाट बघत बसणे किती योग्य आहे?
प्रत्येक क्षण हा योग्यच असतो
चुकतात ते फक्त आपले निर्णय 
✿✿✿
प्रार्थना

रस्त्यात जर एखादे मंदीर दिसले तर प्रार्थना केली नाही तरी चालेल
पण जर रस्त्याने एखादी रुग्णवाहीका जात असेल तर प्रार्थना जरुर करा....

कदाचित कोणचे प्राण वाचतील
✿✿✿




Labels

Find Us On Facebook

Latest Post

मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत

 दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती        इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्...